बांगलादेशचे गोलंदाजी प्रशिक्षक ओटिस गिब्सन यांनी संघाचा अव्वल गोलंदाज आणि माजी कर्णदार मश्रफे मोर्तझाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ते म्हणाले की, मुख्य प्रशिक्षक रसेल डोमिंगो यांच्या २०२३ विश्वचषक योजनेमध्ये कदाचित तो फीट बसत नाही.
मोर्तझाने (Mashrafe Mortaza) झिंबाब्वेविरुद्धच्या देशांतर्गत मालिकेनंतर आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. असे असले तरीही त्याने आपल्या निवृत्तीबद्दल काही स्पष्ट केलेले नाही.
मोर्तझाला पहिल्यांदाच उघडपणे निवृत्ती घेण्याचा सल्ला-
गिब्सन यांनी जानेवारीमध्ये बांगलादेशच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे पद स्विकारले होते. संघाचा कोणताही प्रशिक्षक सदस्य उघडपणे मोर्तझाला निवृत्ती (Retirement Advice) घेण्याचा सल्ला देत असल्याचे पहिल्यांदाच घडत आहे. ते म्हणाले की, डोमिंगो यांना ३ वर्षांमध्ये अनेक युवा गोलंदाजांना पहावे लागेल म्हणजेच त्यांना मोर्तझाऐवजी इतर गोलंदाजांमधील प्रतिभा ओळखावी लागेल.
गिब्सन यांनी बांगलादेशच्या ‘डेली प्रथम’शी बोलताना म्हटले की, “मला असे वाटते की, मोर्तझाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याने केलेल्या कामगिरीवर देशाला अभिमान आहे.”
“पुढील विश्वचषक २०२३मध्ये आहे. तसेच कोणताही आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आतापासूनच संघबांधणी करण्यास सुरुवात करतील आणि यावेळी ते युवा खेळाडूंची प्रतिभाही पाहतील.”
गोलंदाजी प्रशिक्षक गिब्सन (Ottis Gibson) यांनी सांगितले की, “बांगलादेशकडे हसन महमूद, मोहम्मद सैफुद्दीन, शफिउल इस्लाम आणि इबादत हुसेन गोलंदाज आहेतच. परंतु यांच्याव्यतिरिक्त तस्कीन अहमद आणि खालिद हसनसारखे युवा गोलंदाजदेखील आहेत. बांगलादेशसाठी वनडेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा मोर्तझा युवा गोलंदाजांच्या मार्गदर्शकाची भूमिका निभावू शकतो.”
“मोर्तझासाठी पुढे जाण्याची वेळ आहे. तो आपल्या अनुभव आणि ज्ञानाच्या दमावर युवा खेळाडूंची मदत करू शकतो. मला नाही वाटत की, यासाठी त्याला मैदानात खेळण्याची आवश्यकता आहे. तो मैदानाबाहेरही चांगली कामगिरी करू शकतो, असेही ते पुढे म्हणाले.
मोर्तझाने यापूर्वीच कसोटी आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यात त्याने कसोटीत ७८ आणि टी२०त ४२ विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने वनडेत २२० सामने खेळताना २७० विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्रजी बोलता न आलेल्या बाबर आझमने केला असा पलटवार
-बेन स्टोक्स म्हणतो, पराभवानंतर विराटने केली ही घाणेरडी गोष्ट
-एकाच वनडेत ओपनिंग गोलंदाजी व ओपनिंग फलंदाजी करणारे ५ भारतीय