विश्वचषक 2023 मध्ये अफगानिस्तानने 2019 विश्वचषक विजेत्या इंग्लंडला 69 धावांनी पराभूत करत इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्ध अफगानिस्तानच्या सर्वच खेळाडूंनी जबरदस्त प्रर्दशन केले. अफगानिस्तानच्या फिरकी गोलंदाजी पुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश गुडघे टेकले. या पराभवानंतर इंग्लंडवर सर्वच स्तरातुन टीका होत आहे. मात्र, संघाचा स्टार फिरकी गोलंदाज आदिल रशीद याने मोठे वक्तव्य केले आहे. या पराभवाने आपला संघ फारसा नाराज नसल्याचे त्याने सांगितले.
अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर फिरकी गोलंदाज रशीदने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “क्रिकेटमध्ये तुम्ही काही सामने जिंकता आणि काही हारता, तुम्ही प्रत्येक सामना जिंकू शकत नाही. आम्हाला फारशी काळजी नाही. हा फक्त एक सामना आम्ही गमावला आहे. आम्हाला माहित आहे की, आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडून आम्हाला चांगलीच टक्कर मिळत आहे. पण मला विश्वास आहे की, एक संघ म्हणून आम्ही खरोखरच चांगली कामगिरी करू शकतो.”
इंग्लिश गोलंदाज पुढे म्हणाला, “आम्हाला आशा आहे की, आम्ही चांगली कामगिरी करू, आम्हाला माहित आहे की, आमचे अजून 6 सामने बाकी आहेत. आम्ही जिंकू शकतो आणि नक्कीच पात्रता फेरी गाठू शकतो. मला संघावर पूर्ण विश्वास आहे. मला खात्री आहे की, आम्ही आणखी मजबूत पुनरागमन करू. आम्हाला अजूनही आत्मविश्वास आहे आणि आम्ही आमच्या खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देत आहोत. आमची मानसिकता सकारात्मक आहे.”
या विश्वचषकात आतापर्यंत इंग्लंड संघाची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. या विश्वचषकात संघाने तीन सामने खेळले असून दोन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेषत: या स्पर्धेत इंग्लंडची गोलंदाजी खूपच निष्प्रभ दिसली. त्याचबरोबर बेन स्टोक्सही दुखापतीमुळे संघातुन बाहेर आहे. त्याने या विश्वचषकात अद्याप एकही सामना खेळलेला नाही. इंग्लंडला आपला पुढचा सामना 20 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. (Our team is very sensational statement of English bowler after losing Afghanistan)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकातील चौथ्या सामन्याआधी पाकिस्तान अडचणीत! महत्वाचे खेळडू माघार घेण्याच्या तयारीत
माजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेला पडला महागात! पहिले चार खेळाडू स्वस्तात बाद, एकट्या रॉल्फने…