---Advertisement---

ईशान किशनला बीसीसीआयचा मोठा धक्का! सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून सुट्टी; नेमकं कारण काय?

On: मंगळवार, फेब्रुवारी 10, 2026 5:28 PM
---Advertisement---

बीसीसीआयने 2025-26 साठीच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी 34 खेळाडूंना संधी देण्यात आली होती, मात्र यावेळेस 30 खेळाडूंना करारात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, बीसीसीआयने यंदा आपली ‘A+’ ग्रेड काढून टाकली आहे. सध्या टी20 वर्ल्ड कप 2026 सुरू असून ईशान किशन त्यामध्ये खेळताना दिसत आहे. अमेरिकेविरुद्धच्या (USA) शेवटच्या सामन्यात ईशानने आक्रमक फलंदाजी केली होती, पण चांगली सुरुवात मिळूनही तो केवळ 20 धावाच करू शकला. सर्वात मोठी बाब म्हणजे, वर्ल्ड कप खेळत असूनही ईशानला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मिळालेले नाही.

​बीसीसीआयच्या गेल्या वर्षीच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये ईशान किशनचा समावेश होता आणि यंदाही त्याला संधी मिळेल असे वाटत होते. मात्र, बीसीसीआयने त्याला स्थान दिलेले नाही, ज्यामुळे चाहत्यांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट होण्यासाठी खेळाडूंना ठराविक सामने खेळणे आवश्यक असते, परंतु 2025 मध्ये किशन एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. टीम इंडियामध्ये त्याचे पुनरागमन 2026 च्या सुरुवातीला झाले आहे. याच कारणामुळे किशनला यंदाचा कॉन्ट्रॅक्ट ऑफर करण्यात आलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---