---Advertisement---

अविश्वसनीय! मार्टिन गप्टिलने घेतलेला हा भन्नाट झेल पाहून व्हाल थक्क, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 11:50 AM
---Advertisement---

एकीकडे ऑस्ट्रेलियामध्ये बीगबॅश लीग सुरु असताना न्यूझीलंडमध्ये सुपर स्मॅश स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत खेळताना न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिलने शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले आहे. त्याने एक अविश्वसनीय एकहाती झेल घेतला आहे. त्याच्या या झेल घेतल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

शनिवारी(२३ जानेवारी) ऑकलंड विरुद्ध सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघात सामना झाला. या सामन्यात ऑकलंडने प्रथम फलंदाजी करताना १९९ धावा केल्या आणि सेंट्रल डिस्ट्रिक्टला २०० धावांचं लक्ष्य दिले. ऑकलंडकडून कर्णधार रॉबर्ट ओडोनेल(६१) आणि मार्क चॅपमनने (७३) अर्धशतके केली. तसेच गप्टिलने २९ धावा केल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट संघाकडून सलामीवीर जॉर्ज वॉकर आणि डेन क्लेव्हर फलंदाजीसाठी आले. मात्र, चौथ्या षटकात हे दोघेही बाद झाले. त्यातील वॉकरचा झेल गप्टिलने घेतला. झाले असे की, या षटकातील पाचव्या चेंडूवर वॉकरने लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाऊंड्री लाईनजवळ उभा राहिलेल्या मार्टिन गप्टिलने पळत येऊन उजवीकडे उडी घेतली आणि एकाहाताने भन्नाट झेल घेतला.

त्याचा हा व्हिडिओ न्यूझीलंड क्रिकेटने ट्विटरवर शेअर केला आहे.

या सामन्यात सेंट्रल डिस्ट्रिक्टचे दोन्ही सलामीवीर लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार टॉम ब्रुसने अर्धशतकी खेळी करत झुंज दिली होती. मात्र, ५२ धावा करुन तो बाद झाला. त्याच्याशिवाय डो ब्रेसवेलने नाबाद ३२ आणि विल यंगने ३७ धावा करत योगदान दिले. पण तरीही सेंट्रल डिस्ट्रिक्टला २० षटकात ७ बाद १८२ धावाच करता आल्याने हा सामना ऑकलंडने जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

कोहली का रहाणे, कोण आहे टीम इंडियाचा उत्कृष्ट कर्णधार?, टी नटराजनने सांगितलं नाव

“जर वॉशिंग्टन सुंदरने हट्ट केला नसता, तर…”, रिषभ पंतने व्यक्त केली खंत

फ्लाईंग बॅट, ब्रेकिंग बॅट, क्रॅकिंग बॅट! आयसीसीने शेअर केला तुटलेल्या बॅट्सचा मजेशीर व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---