दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे शुक्रवारी(२५ सप्टेंबर) आयपीएल २०२०चा सातवा सामना खेळला गेला. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात हा सामना झाला. चेन्नई संघाचा हा या हंगामातील तिसरा तर दिल्ली संघाचा दूसरा सामना होता. दरम्यान चेन्नईचा धाकड सलामीवीर फलंदाज शेन वॉटसनने नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. Overseas players scoring 1000 IPL runs for CSK
या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुरुवातीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या दिल्ली संघाने २० षटकात ३ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या.
दिल्ली संघाच्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने शेन वॉटसन आणि मुरली विजयला सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर पाठवले. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज वॉटसनने १६ चेंडूत १ चौकार आणि १ षटकार मारत १४ धावा केल्या आणि पव्हेलियनला परतला. दिल्लीच्या अक्षर पटेलने त्याला शिमरॉन हेटमायरच्या हातून झेलबाद केले.
असे असले तरी, १४ धावांसह वॉटसनने चेन्नईकडून खेळताना त्याच्या १००० धावांचा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे चेन्नईकडून खेळताना १००० धावा करणाऱ्या परदेशी फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानावर आला आहे. वॉटसनशिवाय या यादीत फाफ डू प्लेसिस हा अव्वल स्थानावर आहे. त्याने चेन्नईकडून ६६ सामने खेळत १७९२ धावा केल्या आहेत.
तर चेन्नईकडून १००० धावा करणाऱ्या परदेशी खेळाडूंच्या यादीत माइक हसी दूसऱ्या स्थानावर आहे. त्याने चेन्नईकडून ५० सामने खेळत १७६८ धावा केल्या होत्या. तसेच मॅथ्यू हेडन ३२ सामन्यातील ११०७ धावांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना १००० धावांचा आकडा पार करणारे परदेशी खेळाडू
१. फाफ डू प्लेसिस- ६६ सामने, १७९२ धावा
२. माइक हसी- ५० सामने, १७६८ धावा
३. मॅथ्यू हेडन- ३२ चेंडू, ११०७ धावा
४. शेन वॉटसन- ३५ चेंडू, १००४ धावा
महत्त्वाच्या बातम्या –
विक्रमवीरांच्या यादीत थेट दुस-या स्थानी, पाहा पृथ्वी शाॅची खास कामगिरी
“तुमच्या कानाने ऐका, डोळ्याने पहा आणि नंतरच बोला”, ‘त्या’ विधानावर गावसकरांची प्रतिक्रिया
दिल्लीच्या ‘त्या’ दोन महत्त्वाच्या विकेट्स घेत चावलाने केली मलिंगाची बरोबरी
ट्रेंडिंग लेख –
‘या’ खेळाडूने फक्त क्रिकेटचं नाही, तर ड्रग्जचं मैदानही गाजवलंय
वाढदिवस विशेष! भारताच्या फिरकी गोलंदाजीचे ‘मेरूमणी’ बिशनसिंह बेदी
पंजाबच्या ‘या’ ५ शिलेदारांनी गाजवला सामना, बेंगलोरला केले चीतपट






