मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेच्या 25व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला 14 धावांनी पराभूत केले. तसेच, हंगामातील सलग तिसरा विजय मिळवला. या सामन्यात मुंबईने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजी केली. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 192 धावा चोपल्या. या धावाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाचा डाव 178 धावांवरच संपुष्टात आला. हैदराबादची शेवटची विकेट मुंबईकडून अर्जुन तेंडुलकर याने घेतली. ही अर्जुनच्या आयपीएल कारकीर्दीतील पहिली विकेट ठरली. यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार प्रशंसा सुरू झाली. महान फलंदाज सुनील गावसकर यांनीही अर्जुनबाबत मोठे वक्तव्य केले.
काय म्हणाले गावसकर?
दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, त्याला वडील आणि महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याच्या स्वभावाचा वारसा मिळाला आहे. अर्जुनने हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे अखेरचे षटक टाकले. तसेच, त्याची पहिली आयपीएल विकेट घेत मुंबईला 14 धावांनी विजय मिळवून दिला. गावसकरांनी अर्जुन आणि सचिनमधील समानता ओळखली आणि अर्जुनला विचार करणारा क्रिकेटपटू म्हटले.
गावसकरांनी स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटले की, “प्रत्येकजण बोलायचा की, सचिन तेंडुलकरकडे त्याच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला किती प्रतिभा आहे. मात्र, त्याचा जो स्वभाव होता, तो लाजवाब होता. अर्जुनलाही त्याच स्वभावाचा वारसा मिळाला आहे. तो विचार करणारा क्रिकेटपटू दिसतो. हे एक चांगले संकेत आहे की, एक युवा खेळाडूला अखेरचे षटक टाकण्याची संधी मिळते आणि तो संघाला विजय मिळवून देतो.”
https://www.instagram.com/p/CrNs0G2raxm/
युवा खेळाडूंनी सजलाय मुंबई संघ
हैदराबादविरुद्ध 14 धावांनी मिळालेल्या विजयासह मुंबईने इतर संघांना दाखवून दिले आहे की, पाच वेळचे विजेते पुन्हा आपल्या लयीत आले आहेत. मुंबईने सलग 3 सामने जिंकले आहेत. यामागील कारण म्हणजे कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा आणि अर्जुन तेंडुलकर यांसारख्या युवा खेळाडूंचे प्रदर्शन आहे. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ऍरॉन फिंच याचा विश्वास आहे की, मुंबई संघात युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. हा कोणत्याही संघासाठी चांगला संकेत आहे. (pacer arjun tendulkar seems to have inherited father sachins amazing temperament said legend sunil gavaskar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! माजी रणजीपटूचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू
अर्जुनच्या कामगिरीची प्रीती झिंटालाही भुरळ; ट्वीट करत म्हणाली, ‘नेपोटिझममुळे खिल्ली उडवली गेली, पण…’