मुंबई । आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी दुबईला आलेल्या दोन खेळाडूंना कोरोना व्हायरसची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शनिवारी या वृत्ताला दुजोरा दिला. मंडळाने कोणत्याही खेळाडूचे नाव नमूद केले नसले, तरी काही माध्यमांच्या माहितीनुसार त्यातील एक खेळाडू चेन्नई सुपर किंग्स संघातील वेगवान गोलंदाज दीपक चाहर आहे. त्यानंतर आता दीपकची बहीण मालती चाहरने आपल्या भावाचा फोटो शेअर करत एक संदेश लिहिला आहे.
बीसीसीआयने सांगितले की, ‘इंडियन प्रीमियर लीगमधील सहभागी सर्वांची मिळून 1,988 आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात आल्या. यात दोन खेळाडूंसह 13 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात 2 खेळाडूंचा समावेश आहे.’
प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, कोरोना पॉझिटिव्ह सदस्य चेन्नई सुपर किंग्स संघातील असून यात भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरचा समावेश आहे.
यानंतर मालतीने दीपक चाहरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ”तू लढण्यासाठी जन्मलेला खरा योद्धा आहेस. अंधाऱ्या रात्रीनंतर एक दिवस उजाडत देखील असतो. तू पूर्वीपेक्षाही उत्तम पुनरागमन करशील अशी आशा आहे. मी तुझ्या चांगल्या कामगिरीची वाट पहात आहे.” पुढे मालतीने हा संदेश संपूर्ण सीएसके कुटुंबासाठी आहे, असेही सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/CEeev9qjHNg/
भारतात वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा 13वा हंगाम 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार आहे. यादरम्यान आरोग्य आणि सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, सर्व खेळाडूं व्यतिरिक्त सहाय्यक कर्मचारी आणि अधिकार्यांची संपूर्ण हंगामात कोविड -१९ ची सहा वेळा चाचणी घेण्यात येईल. जे लोक पॉझिटिव्ह येतील त्यांना 14 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या –
राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकांनी केली कोरोनावर मात; दुबईमध्ये झाले दाखल
भारतीय दिग्गजाने निवडले आरसीबी संघातील ४ परदेशी खेळाडू, म्हणतोय या हंगामात…
मुंबई इंडियन्स फॅन्स! अशी आहे तूमच्या आवडत्या संघाची नवीन जर्सी
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष : विराट नसता तर बद्रीनाथ असता
मुंबई इंडियन्सचे आयपीएल इतिहासातील ३ चित्तथरारक सामने
आख्ख्या पिढीला वेड्यात काढलेल्या क्रिकेटमधील काही मजेशीर अफवा