श्रीलंका संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यातील कसोटी मालिका न्यूझीलंडने आपल्या नावावर केली आहे. तसेच, आता दौऱ्यातील वनडे मालिकेला शनिवारपासून (दि. 25 मार्च) सुरुवात झाली. ऑकलंड येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडेत न्यूझीलंडने 198 धावांनी शानदार विजय साकारला. या सामन्यात न्यूझीलंडच्या डावादरम्यान चेंडू स्टंप्सला लागूनही फलंदाज नाबाद राहिला. चला तर नेमकं काय घडलं, हे सविस्तर जाणून घेऊयात…
या सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी न्यूझीलंड संघ फलंदाजी करण्यास उतरला होता. न्यूझीलंडच्या डावातील तिसरे षटक कसुन रजिथा (Kasun Rajitha) टाकत होता. तसेच, स्ट्राईकवर फिन ऍलन (Finn Allen) होता. यावेळी रजिथाने षटकातील चौथा चेंडू टाकला असता वेगवान चेंडू ऑफ स्टंपला स्पर्श करून यष्टीरक्षकाच्या हातात गेला. या चेंडूवर जोरदार अपील करण्यात आली. मात्र, टीव्ही रिप्लेमध्ये स्पष्ट दिसले की, चेंडूने ऑफ स्टंपला स्पर्श केला होता, परंतु बेल्स पडल्या नव्हत्या.
https://www.instagram.com/p/CqMYw28MLqZ/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
सामन्यात समालोचन करणारेही या चेंडूवर फलंदाजाला त्रिफळाचीत बाद म्हणत होते. मात्र, रिप्लेनंतर फलंदाजाला नाबाद घोषित करण्यात आले. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जीवदान मिळाल्यानंतर फिन ऍलेन याने 51 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. या सामन्यात ऍलेनव्यतिरिक्त रचीन रवींद्र यानेही 49 धावांचे, तर डॅरिल मिचेल याने 47 धावांचे योगदान दिले. तसेच, ग्लेन फिलिप्स यांनी 39 धावांची खेळी साकारली. यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 49.3 षटकात सर्व विकेट्स गमावत 274 धावा चोपल्या.
या आव्हानाच पाठलाग करताना श्रीलंका संघाची दाणादाण उडाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांचा घाम काढत अवघ्या 19.5 षटकात डाव संपवला. यावेळी श्रीलंकेला 10 विकेट्स गमावत फक्त 76 धावा करता आल्या. त्यामुळे हा सामना न्यूझीलंडने 198 धावांनी आपल्या नावावर केला. न्यूझीलंडकडून यावेळी हेन्री शिप्ले याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त डॅरिल मिचेल आणि ब्लेअर टिकनर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स नावावर केल्या. (pacer kasun rajitha ball hit stumps but bails did not fall in nz vs sl 1st odi match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटच्या टी20 शतकाने नववीच्या विद्यार्थ्यांचे वाढले मार्क! जाणून घ्या नक्की घडलं काय?
सततच्या दुखापतींनंतर बीसीसीआय ‘ऍक्शन मोड’मध्ये! आयपीएलमध्ये प्रमुख खेळाडूंवर ‘तिसरा डोळा’ ठेवणार लक्ष