इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत सर्वाधिक चर्चा कुणाची रंगली असेल, तर ती कदाचित नवीन उल हक याचीच. वादाच्या भोवऱ्यात अडकून जगाचे लक्ष वेधणारा नवीन एलिमिनेटर सामन्यात भलताच चमकला. अफगाणिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने मुंबई इंडियन्स संघाच्या वरच्या फलंदाजी फळीचं कंबरडं मोडलं. त्याने एकाच षटकात सूर्यकुमार यादव आणि कॅमरून ग्रीन या विस्फोटक फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
नवीन उल हकची उच्च दर्जाची गोलंदाजी
झाले असे की, बुधवारी (दि. 24 मे) एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स (Lucknow Super Giants vs Mumbai Indians) संघ आमने-सामने होते. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय लखनऊचा गोलंदाज नवीन उल हक (Naveen ul Haq) याने प्राथमिकरीत्या चुकीचा ठरवला. मुंबईकडून डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेल्या रोहित शर्मा याला नवीनने 11 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कॅमरून ग्रीन (Cameron Green) यांनी वादळी फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. यावेळी ग्रीन आणि सूर्या विस्फोटक फलंदाजी करत होते, यावेळी कर्णधार कृणाल पंड्या (Krunal Pandya) याने 11व्या षटकात चेंडू पुन्हा नवीनच्या हातात सोपवला. त्यानेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
Double-strike alert 🔥🔥
Naveen-ul-Haq gets both Suryakumar Yadav & Cameron Green in the same over 🙌#MI 4️⃣ down now.
Follow the match ▶️ https://t.co/CVo5K1w8dt#TATAIPL | #Eliminator | #LSGvMI pic.twitter.com/mw7GDISSsa
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
एका षटकात दोन मोठ्या विकेट्स
नवीनने 11व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव याला 20 चेंडूत 33 धावांवर खेळत असताना बाद केले. सूर्या बाद होऊन एक चेंडूच झाला असताना सहाव्या चेंडूवर नवीनने ग्रीनला बाद केले. यावेळी नवीनने भेदक गोलंदाजी करत ग्रीनचा ऑफ स्टंप उडवला. ग्रीन यावेळी तो 41 धावा करून बाद झाला. या सामन्यात नवीनने 4 षटके गोलंदाजी करताना 38 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट्स नावावर केल्या.
ग्रीनची वादळी खेळी
कॅमरून ग्रीन याने बाद होण्यापूर्वी जबरदस्त फलंदाजीचे दर्शन घडवले. मुंबईकडून तिसऱ्या स्थानी फलंदाजीसाठी उतरलेला ग्रीन सुरुवातीपासूनच फॉर्ममध्ये दिसला. त्याने यावेळी चौकार-षटकारांची बरसात केली. ग्रीन यावेळी फक्त 23 चेंडू खेळला. मात्र, यावेळी त्याने 178.26च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने 41 धावा कुटल्या. या धावा करताना त्याने 6 चौकार आणि 1 षटकारही मारला. (pacer naveen ul haq took suryakumar yadav and cameron green wicket in one over in ipl 2023 eliminator lsg vs mi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई अडचणीत असताना पंचांनी दिला वादग्रस्त निर्णय! ऑस्ट्रेलियन फलंदाजही नाखुश
आपली प्लेऑफची आकडेवारी पाहून रोहितलाही वाटेल लाज! लखनऊविरुद्ध फक्त 11 धावांवर बाद