दक्षिण आफ्रिका संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडिअम येथे रंगलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 20व्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. आफ्रिकेने गतविजेत्या इंग्लंड संघाला तब्बल 229 धावांनी पराभवाची धूळ चारली. इंग्लंड संघाचा चालू विश्वचषकातील प्रवास खूपच कठीण होत चालला आहे. चार सामन्यात तीन पराभव झाल्यानंतर आता संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
Reece Topley ruled out of the World Cup 2023.
– Feel for him, one of the most unlucky players ever. pic.twitter.com/nLS6FIJJX5
— Johns. (@CricCrazyJohns) October 22, 2023
या विश्वचषकात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. असे असले तरी डावखुरा वेगवान गोलंदाज रिस टोप्ली याने आपला प्रभाव पाडला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. बोटाला झालेल्या या दुखापतीसह आता तो विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
टोप्ली याने या विश्वचषकात आत्तापर्यंत केवळ दोन सामन्यात सहभाग घेतला होता. यामध्ये बांगलादेश व दक्षिण आफ्रिके विरुद्ध चेन्नई प्रत्येकी तीन बळी मिळवले. मात्र, या दोन्ही सामन्यात तो दुखापतींची झुंजताना दिसलेला.
टोप्ली याच्या जागी आता इंग्लंड संघ व्यवस्थापन कोणाला पाचारण करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. युवा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा सध्या संघासोबत असून त्याच्या समावेशाची शक्यता अधिक आहे. आर्चर याने मागील वनडे विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडला विजेते बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
(Pacer Reece Topley Ruled Out From ODI World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या –
मिचेलने सावरला न्यूझीलंडचा डाव! धरमशालेत दिला टीम इंडियाला शतकी घाव
मोठी बातमी! विराटच्या माजी सहकाऱ्याने क्रिकेटला ठोकला रामराम, लगेच वाचा