---Advertisement---

ब्रेकिंग! WTC Finalसाठी कांगारुंच्या प्लेइंग 11मध्ये ‘हा’ घातक वेगवान गोलंदाज सामील, कमिन्सकडून पुष्टी

Australia-Cricket-Team
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना खेळण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ उरला आहे. अशात या सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया संघाने प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी घोषणा केली आहे. कर्णधार पॅट कमिन्स याने वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड याला ताफ्यात सामील केल्याची घोषणा केली आहे. यासोबतच आता भारताविरुद्ध सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाजी फळी कशी असेल, या प्रश्नाचे उत्तरही मिळाले आहे.

विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघाला जोश हेजलवूड (Josh Hazlewood) डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यातून बाहेर पडल्यामुळे मोठा धक्का बसला होता. त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाने मायकल नेसर (Michael Neser) याला ताफ्यात सामील केले होते. त्यामुळे असे म्हटले जात होते की, नेसर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळताना दिसू शकतो. मात्र, कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने सामना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वीच स्पष्ट केले की, प्लेइंग इलेव्हनमध्ये स्कॉट बोलँड (Scott Boland) याला जागा मिळणार आहे.

कशी आहे बोलँडची कारकीर्द?
स्कॉट बोलँड याने ऑस्ट्रेलिया संघाकडून आतापर्यंत 7 कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 13.42च्या शानदार सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने यादरम्यान एक वेळा 4 विकेट्स आणि एक वेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 7 धावा खर्च करत 6 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

बोलँड याने वयाच्या 32व्या वर्षी 2021मध्ये इंग्लंड क्रिकेट संघाविरुद्धच्या ऍशेज मालिकेदरम्यान आपले कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर बोलँड सातत्याने कौतुकास्पद कामगिरी करत आहे.

डब्ल्यूटीसी अंतिम सामना
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील डब्ल्यूटीसी अंतिम सामना 7 ते 11 जून यादरम्यान इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. जर पावसाने व्यत्यय आणला, तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी राखीव दिवशी खेळ खेळला जाईल. (pacer scott boland included in australia playing xi for wtc final skipper pat cummins confirms)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटपटूंचे सोशलमीडिया हँडल हॅक होण्याचे सत्र सुरूच, आता ‘या’ अष्टपैलूवर आले संकट
WTC फायनलमध्ये पावसाने खोडा घातला तर कुणाला मिळणार ट्रॉफी? लगेच वाचा काय सांगतो नियम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---