पाकिस्तान संघ विश्वचषक 2023 स्पर्धेतील 12व्या सामन्यात भारताविरुद्ध आपल्या तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात होता. मात्र, भारताने त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने आपल्या खिशात घातला. तसेच, स्पर्धेत विजयाची हॅट्रिक केली. दुसरीकडे, सामन्यादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 50 धावा करून बाद झाल्यानंतर चाहत्याचा संताप झाला. चिमुकल्या चाहत्याने निराश होऊन बॉटल टीव्हीवर फेकली. यामुळे टीव्ही खाली पडली. अशात यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
बाबर कसा झाला बाद?
झाले असे की, भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजी करताना पाकिस्तानने 42.5 षटकात 10 विकेट्स गमावत 191 धावा केल्या होत्या. यादरम्यान बाबर आझम चांगल्या लयीत फलंदाजी करत होता. त्याने अर्धशतकही पूर्ण केले होते. मात्र, मोहम्मद सिराज टाकत असलेल्या 30व्या षटकातील चौथ्या चेंडूवर बाबरचा त्रिफळा उडला. त्यामुळे बाबरला 58 चेंडूत 50 धावा करून तंबूत जावे लागले. त्याच्या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता.
आता बाबरच्या चिमुकल्या चाहत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसते की, चिमुकला चाहता आपल्या कुटुंबासोबत बसून सामना पाहत असतो. मात्र, बाबरची जशी विकेट पडते, तसा तो निराश होतो आणि रागाच्या भरात बॉटल टीव्हीवर फेकून मारतो. यामुळे टीव्ही खाली पडून बंद होते. बाबरची विकेट पडल्यामुळे चाहता खूपच रागात दिसत आहे. टीव्ही खाली पडल्यानंतर त्याचे आई-वडील त्याला समजावून सांगतात की, “हा फक्त खेळ आहे. यासाठी इतका भावूक का होत आहे.” मात्र, चिमुकल्याच्या चेहऱ्यावरची निराशा काही जात नाही.
Dear babar Azam you have to pay for it
Or to score 100 against Aussies#INDvsPAK#ENGvsAFG#BabarAzam𓃵 pic.twitter.com/92rntSqSq7
— 𝐂𝐫𝐢𝐜 𝐙𝐞𝐞 (@slaveofallah002) October 15, 2023
मात्र, हा व्हिडिओवर एडिट केल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे की, “एडिटिंग.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “काय एडिट केलाय, म्हणजे काहीही.”
पॉईंट्स टेबलमध्ये भारताचा जलवा
या विजयासोबतच भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकाच्या इतिहासातील सलग 8वा सामना जिंकला. पाकिस्तान वनडे विश्वचकात भारताविरुद्ध एकदाही विजय मिळवू शकला नाहीये. विशेष म्हणजे, या विजयामुळे भारत पॉईंट्स टेबलमध्ये थेट अव्वलस्थानी विराजमान झाला आहे. भारताने न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेला पछाडत हे स्थान काबीज केले. (captain babar azam became bold against india tv fell by hitting little fans with a bottle ind vs pak world cup 2023)
हेही वाचा-
‘इंग्लंड संघ सेमीफायनलमध्ये…’, लाजीरवाण्या पराभवानंतर माजी कर्णधाराची धक्कादायक भविष्यवाणी
इंग्लंडच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची नाचक्की! Points Tableमध्ये पहिल्यांदाच नेदरलँड्स अन् श्रीलंकेच्याही खाली