भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धा गाजवत आहे. शनिवारी (दि. 14 ऑक्टोबर) पाकिस्तानने भारताला विजयासाठी 192 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान भारताने सहज पार करत 7 विकेट्सने विक्रमी विजय मिळवला. या सामन्यात भारतीय गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार प्रदर्शन केले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने तर धमाकेदार 86 धावांची खेळी साकारली. त्याच्यामुळे भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला. या सामन्यानंतर विराट कोहली याने स्वाक्षरी केलेली एक भारतीय जर्सी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला भेट म्हणून दिली. यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने मोठे विधान केले.
काय म्हणाला वसीम अक्रम?
सामन्यानंतर भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला स्वाक्षरी केलेली जर्सी दिली. यावरून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) भडकला. त्याने एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमातच बाबरवर आगपाखड केली.
तो म्हणाला, “मी म्हणत आहे की, तुम्ही मोठा सामना पराभूत झाला आहात. तुम्ही असे काही वैयक्तिक पातळीवर केले पाहिजे होते. कॅमेऱ्यापुढे, आज असे करण्याचा दिवस नव्हता. जर तुमच्या काकाच्या मुलाने तुला विराटकडून जर्सी आणायला सांगितली आहे, तर तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये जाऊन विराटकडून त्याचा टी-शर्ट घ्यायला पाहिजे होता.”
Wasim Akram says "Babar Azam shouldn't have asked Virat Kohli his Tshirt"pic.twitter.com/KREc7H41Pm#INDvsPAK #indvspak2023 #Rizwan #RohitSharma𓃵 #IndiaVsPakistan #CWC23 #ICCCricketWorldCup23 pic.twitter.com/NEhiFEzEMp
— ICT Fan (@Delphy06) October 14, 2023
भारताचा शानदार विजय
या सामन्यात भारताकडून कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी शानदार गोलंदाजी केली. त्यांच्यामुळेच पाकिस्तान संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्यांना फक्त 191 धावा करता आल्या. पाकिस्तानसाठी बाबरने सर्वाधिक 50 धावा केल्या. तसेच, मोहम्मद रिझवान यानेही 49 धावांची खेळी केली.
FANBOY MOMENT FOR BABAR AZAM….!!
Babar asks for a signed from Virat Kohli and Virat gives it.pic.twitter.com/Caq3GoQoaV
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 14, 2023
पाकिस्तानच्या 192 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चमकला. त्याने डावाच्या सुरुवातीपासूनच तडाखेबंद फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने 63 चेंडूत 86 धावा केल्या. यात 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त श्रेयस अय्यर यानेही नाबाद 53 धावांचे मोलाचे योगदान दिले. तसेच, शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. अशाप्रकारे भारताने हा सामना सहजरीत्या नावावर केला. (virat kohli gifted his jersey to pak captain babar azam wasim akram india vs pakistan icc odi world cup 2023)
हेही वाचा-
अरे…आवरा! बाबरची विकेट पडताच चाहत्याने बॉटल मारून फोडली टीव्ही? नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया एकदा वाचाच
‘इंग्लंड संघ सेमीफायनलमध्ये…’, लाजीरवाण्या पराभवानंतर माजी कर्णधाराची धक्कादायक भविष्यवाणी