मंगळवारी (१५ मार्च) पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याने दोन वर्षांनंतर कसोटी शतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना कराचीमध्ये खेळला जात आहे, ज्यामध्ये पाकिस्तान संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करत होता. परंतु, बाबर आजम आणि अब्दुल्ला शफिफने सामन्याच्या चौथ्या दिवशी केलेल्या शतकीय भागीदारीमुळे संघाने सामन्यात पुनरागमन केले आहे. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने याच पार्श्वभूमीवर एक खास ट्वीट केले आहे.
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या केल्यानंतर पाकिस्तान संघ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात सामना निकाली काढण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया संघाने लवकर डाव घोषित केला आणि पाकिस्तानला फलंदाजीची संधी दिली. पाकिस्तानेही आता या संधाची फायदा घेतला आहे. चौथ्या दिवसाखेर खेळपट्टीवर बाबर आजम (Babar Azam) १०२ आणि अब्दुल्ला शफीफ (Abdullah Shafique) ७१ धावांसह कायम होते आणि शेवटच्या दिवशी त्यांचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसी पाकिस्तान संघाने २ विकेट्सच्या नुकसानावर १९२ धावा केल्या. शेवटच्या दिवशी पाकिस्तानला विजयासाठी अजून ३१४ धावांची आवश्यकता आहे आणि त्यांच्या ८ विकेट्सही शिल्लक आहेत. अशात शेवटच्या दिवसाचा खेळ रोमांचक बनला आहे. भारतीय दिग्गज अश्विननेही या रोमांचकल लढतीची दखल घेतली आहे. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने एक खास ट्वीट करत लिहिले की, “बाबर आजम, उद्या एक रोमांचक समाप्ती होणार आहे.”
Babar Azam 👏👏, going to be an exciting finish tomorrow. #PAKvAUS
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) March 15, 2022
दरम्यान, पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सच्या नुकसानावर ५५६ धावा केल्या आणि डाव घोषित केला. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ अवघ्या १४८ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सच्या नुकसानावर ९७ धावा केल्या आणि पाकिस्तानला पुन्हा फलंदाजीसाठी बोलावले.
विजयासाठी पाकिस्तानपुढे ५०६ धावांचे आव्हान होते. पण बाबर आणि शफीफच्या खेळीमुळे संघ लक्ष्याच्या जवळ पोहोचला आहे. दुसऱ्या डावातही पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. अवघ्या २१ धावांवर पाकिस्तनने दोन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर आलेल्या बाबरने सलामीवीर शफीफसोबत मिळून महत्वाची भागीदारी पार पाडली.
महत्वाच्या बातम्या –
भारत व इंग्लंडकडून कसोटी सामने खेळणारा ‘हा’ एकमेव क्रिकेटपटू माहित आहे का?
तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिनने केलं होतं ‘शतकांचं शतकं’
केरला ब्लास्टर्स तिसऱ्यांदा फायनलमध्ये; लीग शील्ड विजेत्या जमशेदपूरचे पॅकअप