पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (PAK vs AUS) यांच्यात शनिवारपासून (१२ मार्च) कराची येथे दुसरा कसोटी (Second Test) सामना खेळला जात आहे. या सामन्यात पाहुणा ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम फलंदाजी करत असून त्यांनी दुसऱ्या दिवसापर्यंत ४ विकेट्सच्या नुकसानावर ३५० पेक्षा जास्त धावा फलकावर लावल्या आहेत. या सामन्यादरम्यान एक फार दुर्मिळ पाहायला मिळणारी घटना घडली. ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या क्रमांकावरील फलंदाज मार्नस लॅब्यूशेन (Marnus Labuschagne) फलंदाजीसाठी मैदानावर येत असताना पाकिस्तानच्या दर्शकांनी त्याचे जोरजोराने अभिवादन (Pakistani Fans Welcomed Marnus Labuschagne) केले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मार्नस पाकिस्तानात पाहुणा असूनही त्याने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी मने जिंकली आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे दर्शक त्याला पाठिंबा देताना दिसले. दुसऱ्या कसोटी सामन्यात सलामीवीर डेविड वॉर्नर वैयक्तिक ३६ धावांवर बाद झाला. त्याच्या विकेटनंतर मार्नस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. तो फलंदाजीसाठी कराचीच्या मैदानावर उतरत असताना पाकिस्तानी दर्शकांनी त्याचे धमाकेदार स्वागत केले. स्टँडमध्ये असलेल्या दर्शकांनी उभे राहून मार्नसचे अभिवादन केले.
मात्र मार्नसला ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात खास प्रदर्शन करता आले नाही. तो ९ चेंडूंचा सामना करताना भोपळाही न फोडता बाद झाला.
https://twitter.com/HesyRock/status/1502534848640126976?s=20&t=QbijJhGZH1l9W-52t58lGA
मार्नस असा झाला धावबाद
ऑस्ट्रेलियाच्या डावातील २१ वे षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मार्नसने मिड ऑफच्या दिशेने फटका खेळला आणि तो एक धावा चोरण्यासाठी वेगाने पळत सुटला. परंतु त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि तो शून्यावर धावबाद (Marnus Labuschagne Run Out On Zero) झाला. पाकिस्तानच्या क्षेरत्रक्षक साजिद खानने पटकन चेंडू उचलला आणि नॉन स्ट्राईकच्या दिशेने डायरेक्ट थ्रो केला. परिणामी मार्नस धावबाद झाला.
𝐍𝐨 𝐑𝐮𝐧 for Marnus today. #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/Hww22n089e
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 12, 2022
पहिल्या कसोटीत मार्नसचे थोडक्यात हुकले शतक
यापूर्वी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील पहिला सामना रावळपिंडी येथे पार पडला. या सामन्यात मार्नसचे शतक केवळ १० धावांनी हुकले होते. तो या सामन्यात १५८ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांच्या मदतीने ९० धावांवर झेलबाद झाला होता. शाहिन आफ्रिदीने अब्दुल्लाह शफिकच्या हातून त्याला झेलबाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
दुसऱ्या कसोटीत विराटने केले असे काही की, चाहत्यांनी दिले त्याच्या अन् डिविलियर्सच्या नावाचे नारे
दोनशेपेक्षा जास्त चेंडूंचा सामना करूनही स्मिथला पूर्ण करता आले नाही शतक, झाला सहज झेलबाद