---Advertisement---

VIDEO: इमाम उल हकने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धूव्वा उडवत ठोकले शतक, मिशेल स्टार्कही हतबल

Imam-ul-Haq
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षानंतर पाकिस्तान ((Australia tour of Pakistan) दौऱ्यावर गेला आहे. या दोन संघांमध्ये तीन दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. त्यानंतर हे दोन संघ एकदिवसीय आणि टी२० मालिका खेळणार आहेत. या मालिकेच्या पहिल्या सामन्याला ४ मार्चपासून रावळपिंंडी येथे सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली.

यादरम्यान शफिक अर्धशतक करून बाद झाला, परंतु, इमामने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना त्रास देत शतक ठोकले. आपल्या शतकी खेळीत इमामने सर्व गोलंदाजांचा धुव्वा उडवला, पण ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिशेल स्टार्कसुद्धा त्याच्यासमोर पूर्णपणे असहाय्य दिसत होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इमाम मिशेल स्टार्कच्या षटकांमध्ये सलग चौकारांचा वर्षाव करताना दिसला. इमामने ५४व्या षटकातील पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर हे चौकार मारले. इमामची चमकदार फलंदाजी पाहून स्टार्कही हसला कारण, की त्याच्याकडे त्याच्या मोठ्या फटक्यांचे उत्तर नव्हते.

या कसोटी मालिकेबाबत संपूर्ण पाकिस्तानमध्ये जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून ऑस्ट्रेलिया संघाला पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर हरवणे अजिबात सोपे जाणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानने या सामन्यात पहिल्या डावात ९० षटकात १ बाद २४५ धावा केल्या. यामध्ये इमामने नाबाद १३२ धावा केल्या, तर अझर अली नाबाद ६४ धावा केल्या.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात पहिला कसोटी सामना रावळपिंडी येथे ४ मार्च ते ८ मार्चपर्यंत खेळला जाणार आहे. दुसरा सामना १२ ते १६ मार्चदरम्यान कराची येथे, तर तिसरा सामना २१ ते २५ मार्च दरम्यान लाहोर येथे खेळला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर या दोन संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. पहिला एकदिवसीय सामना २९ मार्च, दुसरा ३१ मार्च तर तिसरा एकदिवसीय सामना २ एप्रिल रोजी रावळपिंडी येथे खेळले जाणार आहेत. तसेच ५ एप्रिलला एकमेव टी२० सामना रावळपिंडी येथे पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

शासकीय इतमामात होणार वॉर्नवर अंत्यसंस्कार; ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांकडूनही श्रद्धांजली

‘त्या’ मुलीने केली होती विराटच्या शंभराव्या कसोटीची अचूक भविष्यवाणी; सेहवागने शेअर केले ट्विट

शेन वॉर्नच्या अचानक जाण्याने चाहते शोकसागरात; फूल, बियरसह आवडत्या वस्तू देत वाहिली श्रद्धांजली

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---