सध्या पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये सध्या सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श याला दूखापत झाल्यामुळे तो पाकिस्तानविरुद्धच्या दूसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. परंतु तो आता आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघासोबत जोडला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला ६.५ कोटींना विकत घेतले आहे. त्याला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापुर्वी दूखापत झाली होती, त्यामुळे तो पहिला एकदिवसीय सामना देखील खेळू शकला नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ८८ धावांनी पराभूत केले.
माध्यमांतील वृत्तांनुसार, ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि सध्याचा साउथ वेल्सचा फिजियोथेरपिस्ट मार्शला दुखापतीतून सावरण्यासाठी मदत करतील. हा अष्टपैलू खेळाडू भारतात येऊन आपला क्वारंटाईन कालावधी पुर्ण करणार आहे. मार्श म्हणाला की, “आपल्या फ्रॅंचायझीवर लक्ष्य केंद्रित करणे सर्वात चांगला मार्ग आहे. मी पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाल्यामूळे नाराज आहे, परंतु पुढच्या दौऱ्यासाठी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया संघामध्ये समाविष्ट होण्यासाठी उत्सुक आहे.” मार्श आणि डेविड वाॅर्नर हे ६ एप्रिलला आपापल्या आयपीएल फ्रॅंचायझीसोबत दिसणार आहेत.
मार्श आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबतचे पहिले ३ सामने न खेळण्यास तयार होता, कारण तो पाकिस्तान दौऱ्यावर एकदिवसीय आणि टी२० मालिकांसाठी संघाचा भाग होता, तो ५ एप्रिलला भारतात दाखल होणार होता. परंतु तो आता भारतात लवकरच येणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने यंदा ७ विदेशी खेळाडू खरेदी केले आहेत, ज्यांमधील २ खेळाडू मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध होते.
रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघ एन्रिच नाॅर्किया संघात पुन्हा येणे आणि सामन्यात फिटनेससह पुनरागमन करण्याची प्रतिक्षा करत आहे. सध्या संघाजवळ वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी आणि मुस्तफिजुर रहमान हे खेळाडू उपलब्ध आहेत, त्यांनी त्यांचा क्वारंटाईन कालावधी पुर्ण केला आहे. दिल्लीचा पुढील सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध २ एप्रिलला पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL2022| चेन्नई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
CSK vs LSG | केव्हा आणि कसा पाहाल चेन्नई वि. लखनऊ सामना, कसे असेल हवामान, जाणून घ्या सर्वकाही
केकेआरविरुद्ध थरारक विजय मिळवूनही आरसीबीचा कर्णधार नाराज, ‘या’ गोष्टीचं वाटतंय वाईट