पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या खेळल्या जात असलेल्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना मंगळवारी (२९ मार्च) खेळला गेला. लाहोरच्या लद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८८ धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज बेन मॅकडरमॉट ज्या पद्धतीने धावबाद झाला, ते पाहून उपस्थित सर्वजण हैराण झाल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानसाठी त्यांचा अष्टपैलू खुशदिल शाह (Khushdil Shah) सामन्यातील ३३ व्या षटकात गोलंदाजी करत होता. खुशदिलच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बेन मॅकडरमॉट (Ben McDermott) एक धाव घेण्याच्या प्रयत्नात होता. यादरम्यान ऑफ साइडवरील क्षेत्ररक्षक मोहम्मद वसीम (Mohammad Wasim) याच्याकडे हा चेंडू रोखण्याची पूर्ण संधी होती. पण त्याने यावेळी चपळाई न दाखवल्यामुळे चेंडू पकडू शकला नाही.
असे असले तरी, मोहम्मद वसीम चेंडू पकडण्यासाठी दुसऱ्यांदा धावला. यावेळीही त्याने अत्यंत निवांतपणे चेंडू फेकला. पण नशिबात असेलली गोष्ट मिळतेच, असे म्हणतात ना. ते या सामन्यात हे खरे ठरले. क्षेत्ररक्षकाच्या हातून मोठी चूक झाली असतानाही दुसरी धाव घेण्याच्या नादात मॅकडरमॉटने धावबाद होऊन स्वतःची महत्वाची विकेट गमावली.
दुसऱ्या प्रयत्नात जेव्हा वसीमने चेंडू पकडला, तेव्हा पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानने तो कसलीही चूक न करता पकडला आणि यष्टीचीत केली. स्टंपिंगच्या वेळी फलंदाज स्ट्राइकपासून लांब असल्याचे दिसले आणि परिणामी त्याला तंबूत परतावे लागले. २७ वर्षीय मॅकडरमॉट या सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी ५५ धावांचे योगदान देऊ शकला. यासाठी त्याने ७० चेंडूचा सामना केला आणि ४ चौकार ठोकले.
McDermott falls short! #BoysReadyHain I #PAKvAUS pic.twitter.com/Bw4tLPEiJl
— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 29, 2022
सामन्यातील मोहम्मद वसीमच्या प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने चाहत्यांची निराशा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने क्षेत्ररक्षणासोबत गोलंदाजीतही सुमार प्रदर्शन केले. वसीमने ८ षटके गोलंदाजी केली आणि यामध्ये ७.३७ च्या इकोनॉमीने ५९ धावा खर्च केल्या. यादरम्यान त्याला एकही विकेट मिळाली नाही.
महत्वाच्या बातम्या –
जंटलमन हॅश- दारुच्या ब्रँडचा लोगो जर्सीवर न लावल्यामुळे लाखो रुपये गमावलेल्या हशिम आमलाची गोष्ट
सचिन, गांगुली आणि द्रविडने २५ वर्षांपूर्वी तोडले होते कोट्यवधी भारतीय चाहत्यांचे मन
जिंकली बेंगलोर पण चर्चा कोलकाताच्या हुकमी गोलंदाजाची, IPL इतिहासात नोंद होणारा केला रेकॉर्ड