---Advertisement---

मोठी बातमी! पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी

On: सोमवार, फेब्रुवारी 28, 2022 11:23 PM
Cricket-Australia
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ २४ वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर (Pakistan vs Australia 2022) गेला आहे. या दोन संघांमध्ये ३ कसोटी मालिका, ३ एकदिवसीय मालिका आणि १ टी२० मालिका खेळल्या जाणार आहेत. पहिला कसोटी सामना ४ मार्च रोजी रावळपिंडी येथे होणार आहे. मात्र, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा फिरकी गोलंदाज एश्टन एगरला (Ashton agar) जीव मारण्याची धमकी देण्यात आली आहे. चौकशीनंतर पाकिस्तान क्रिकेट बाॅर्डाने आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) सोशल मीडियावर मिळालेल्या या धमकीला गंभीर मानले नाही.

एश्टन एगरची पार्टनर मॅडलीनने सोशल मीडियावर एक मेसेज केला होता, ज्यामध्ये काही अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे की, जर एगर पाकिस्तानमध्ये आला, तर त्याचे चांगले होणार नाही. माध्यमांतील वृत्तांनुसार, एश्टन एगरची पार्टनर मॅडलीनला मेसेज पाठवण्यात आला की, “एश्टनने पाकिस्तानात येऊ नये, जर तो पाकिस्तानात आला तर तो जिवंत राहणार नाही.” यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तपास सुरू केला आणि आता दोन्ही बोर्डांनी हे प्रकरण गंभीर नसल्याचे सांगितले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि पीसीबी यांच्याकडून या प्रकरणावर एक निवेदन जारी करण्यात आले आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सोशल मीडिया पोस्टबद्दल माहिती आहे. पीसीबी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि दोन्ही देशांच्या सरकारी संस्थांनी याची चौकशी केली. अशा संदेशांसाठी व्यापक सुरक्षा व्यवस्था केली जात आहे. या प्रकरणाबाबत ते धोकादायक मानता येणार नाही. याशिवाय यावेळी कोणतेही भाष्य करता येणार नाही.

इस्लामाबादला पोहोचल्यावर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, “मला पूर्णपणे सुरक्षित वाटत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सर्व तयारी केली असून आमच्या आगमनावेळी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक होती.”

सन २००९ मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये फार काळ आंतरराष्ट्रीय सामने होऊ शकले नाहीत. यानंतर कोणताच संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही. त्यानंतर २०१५ पासून सामने हळूहळू सुरू झाले.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---