पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पाकिस्ताननं पहिला डाव 6 बाद 448 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात, बांगलादेशनं पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी पहिल्या डावात 565 धावा केल्या.
बांगलादेशसाठी मुशफिकुर रहीमनं तब्बल साडेआठ तासांहून अधिक काळ मॅरेथॉन खेळ खेळली. त्यानं 341 चेंडूंत एक षटकार आणि 22 चौकारांसह 191 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर बांगलादेशला पहिल्या डावात 117 धावांची मोठी आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात पाकिस्तानची अवस्था वाईट झाली असून संघावर पराभवाचं सावट आहे.
दरम्यान, या सामन्यात एक धक्कादायक घटना घडली, ज्यामुळे अनेक चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाकिस्तानच्या डावाच्या 33व्या षटकात स्टार अष्टपैलू शाकिब अल हसननं आपलं संतूलन गमावलं आणि चेंडू मुद्दाम फलंदाज रिझवानच्या दिशेनं फेकला. झालं असं की, षटकातील पहिल्या चेंडूवर शाकिबनं रिझवानविरुद्ध एलबीडब्ल्यूचं अपील केलं, जे पंचांनी फेटाळलं. कर्णधार शांतोनं रिव्ह्यू घेण्याचं ठरवलं, परंतु पंचांना इशारा देण्यास विलंब झाला.
यानंतर दुसरा चेंडू खेळण्यापूर्वी रिझवान थोडा वेळ घेत विकेटच्या मागे काही तरी हातवारे करत होता, तर गोलंदाज शाकिब चेंडू टाकण्यासाठी पूर्णपणे सज्ज होता. रिजवान मागे वळून पाहत होता. यादरम्यान तो चेंडू खेळण्यासाठी सज्ज होऊ लागला असताच शाकिबनं चेंडू थेट किपिंग करत असलेल्या लिटनच्या हातात भिरकावला. हे पाहून रिझवान स्तब्ध झाला, कारण तो चेंडू खेळायला तयार नव्हता. शाकिबनं इतक्या वेगानं चेंडू फेकला की, रिझवान थोडासाही सरकला असता तर चेंडू त्याला जाऊन आदळला असता.
अंपायर रिचर्ड केटलबरो देखील शाकिबच्या या कृतीनं आश्चर्यचकित झाले. त्यांनी शाकिबला इशारा दिला, ज्यानंतर त्यानं आपली चूक मान्य करत पुढच्या चेंडूची तयारी केली. अंपायरनं या चेंडूला डेड बॉल घोषित केलं. शाकिब अल हसननं दुसऱ्या डावात 16 षटकात 40 धावा देत 3 बळी घेतले.
View this post on Instagram
हेही वाचा –
बाबर आझमला कसोटी संघातून डच्चू मिळणार? आकडेवारी फारच लाजिरवाणी
मनू भाकरनं घेतली टीम इंडियाच्या वर्ल्ड कप हिरोची भेट! सोशल मीडियावर फोटो व्हायरल
5 भारतीय खेळाडू ज्यांनी यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला, एकाची तुलना चक्क धोनीशी व्हायची!