कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रूटची बॅट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रुट आता मुलतानचा नवा सुलतान बनला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जो रूटने पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमधलं दुसरं द्विशतक झळकावलं आहे. मुलतानमधील एका फलंदाजाने प्रदीर्घ काळानंतर केलेले हे द्विशतक आहे. वीरेंद्र सेहवागने येथे कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले आहे. मात्र, आता जो रूटला मुलतानचा नवा सुलतान संबोधले जाईल. कारण पाकिस्तानविरुद्ध त्यांच्याच भूमीवर द्विशतक झळकावणे ही स्वतःमध्येच मोठी गोष्ट आहे.
या सामन्यात जो रूटने 305 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. जो रूटने 2022 मध्ये मुलतानमध्ये फलंदाजी केली नाही. परंतु यावेळी त्याने पाकिस्तानला सामन्यात मागे ढकलण्याचे काम केले. जो रूटचे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे सहावे द्विशतक आहे. या खेळीत त्याने केवळ 14 चौकार मारले आहेत. खेळपट्टी सपाट आणि फलंदाजीसाठी सोपी असली तरी, पाकिस्तानने पहिल्या डावात 556 धावा केल्यामुळे जो रुटने इंग्लंडचे एक टोक राखून ठेवत चांगली कामगिरी केली.
रूटने 2016 मध्ये मँचेस्टरमध्ये पाकिस्तानविरुद्ध 254 धावांची इनिंग खेळली होती. ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्याचबरोबर त्याने श्रीलंकेविरुद्ध दोन द्विशतके आणि न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी एक द्विशतक झळकावले आहे. आज जर रूटने वेगवान फलंदाजी केली तर तो वीरेंद्र सेहवागप्रमाणे मुलतानमध्ये त्रिशतक ठोकू शकतो. कारण या खेळपट्टीवर गोलंदाजांसाठी काहीच मदत नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तान संघाने पहिल्या डावात 149 षटकात सर्व गडी गमावून 556 धावा केल्या होत्या. तर या बातमीआखेरीस इंग्लंड संघ 122 षटकात 606-3 अश्या स्थितीत आहे. पाकिस्तानसाठी तीन फलंदाजांनी शतके झळकावली आहेत. तर इंग्लंडसाठी जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी प्रत्येकी एक द्विशतक आणि एक शतक झळकावले आहे. हॅरी ब्रूकनेही 190 धावा पार केल्या आहेत. पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफीक, शान मसूद आणि आगा सलमान यांनी शतके झळकावली होती.
हेही वाचा-
IND vs BAN: दमदार कामगिरीबाबत बोलताना रिंकू म्हणाला, “मी माही भाईकडून…”,
भारताचा घरच्या मैदानावर सलग सातवा टी20 मालिका विजय, ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम धोक्यात
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची मोठी झेप; जाणून घ्या सेमीफायनलचे समीकरण