आबू धाबी | शुक्रवारी(7 डिसेंबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाने 123 धावांनी शानदार विजय मिळवला. यामुळे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड संघाने 2-1 आशा फरकाने विजय मिळवत इतिहास रचला.
न्यूझीलंडला 1969 नंतर प्रथमच पाकिस्तानविरुद्ध परदेशात विजय मिळवता आला आहे. त्यांनी 1969नंतर पाकिस्तान किंवा अन्य देशांत कसोटी मालिकेत पाकिस्तान संघाविरुद्ध विजय मिळवला नव्हता. त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय खास ठरला आहे.
न्यूझीलंडच्या या विजयात त्यांचा कर्णधार केन विलियमसनने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या सामन्यात पहिल्या डावात 89 आणि दुसऱ्या डावात नाबाद 139 धावांची खेळी केली. यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.
पण जेव्हा कर्णधार म्हणून त्याने मालिका विजयाची ट्रॉफी स्विकारली तेव्हा त्याच्याकडून एक अनोखी कृती पहायला मिळाली. त्याने कोणीतरी पाहुणे आपल्याला ती ट्रॉफी देतील याची वाट न पाहताच स्वत:च त्याने ती ट्रॉफी उचलली आणि तो त्याच्या संघाकडे चालू लागला.
यावेळी त्याची वाट पाहत उभ्या असणाऱ्या संघातील एका संघसहकाऱ्याकडे असणारा लाल रंगाचा समानावीराच्या पुरस्काराच्या प्रतिकृतीचा बोर्डही त्याने मैदानावरच फेकून दिला आणि मालिका विजयाचा आनंद साजरा केला.
https://twitter.com/CricCrazyNIKS/status/1071217352157614080
तसेच या मालिकेच्या ट्रॉफीवरुनही अनेक चर्चा झाली आहे, कारण या ट्रॉफीवर ‘ओय होय’ असे इंग्लिशमध्ये लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–पुजाराने शतकी खेळी केली अॅडलेडमध्ये, चर्चा झाली कोलकाता पोलिसांत
–त्या एका विजयाने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल