दक्षिण आफ्रिकेला मायदेशातील पहिल्या कसोटीत पराभूत केल्यानंतर यजमान पाकिस्तानच्या संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. कोरोना विषाणूमुळे, दोन्ही संघ जैवसुरक्षित वातावरणात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. रावळपिंडी येथे होणाऱ्या दुसर्या कसोटीसाठी पाकिस्तानच्या संघात एकही बदल केला गेला नाही. दुसऱ्या सामन्यासाठी पाकिस्तानच्या १७ सदस्यीय संघात कोणताही बदल केला गेला नसल्याचे, संघ व्यवस्थापनाने जाहीर केले.
पाकिस्तानी घेतली आहे मालिकेत आघाडी
सुमारे १४ वर्षानंतर दक्षिण आफ्रिका संघ पाकिस्तान दौर्यावर आला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना कराची येथे खेळला गेला होता. यजमान पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ७ गड्यांनी पराभूत करून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी ४ फेब्रुवारीपासून रावळपिंडीमध्ये खेळली जाईल. यानंतर दोन्ही देश ३ सामन्यांची टी२० मालिकासुद्धा खेळतील. या टी२० मालिकेचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळले जातील.
मागील दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेने मिळवला होता विजय
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अखेरच्या वेळी २००७ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर पाकिस्तानला मायदेशात पराभूत करण्याची कामगिरी दक्षिण आफ्रिका संघाने केली होती. ही मालिका दक्षिण आफ्रिकेने १-० अशा फरकाने आपल्या नावे केलेली. त्यामुळे, या दौर्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत होऊन मायदेशी परतण्याचा आवडणार नाही. हा संघ पहिल्या कसोटीत पराभूत झाला असला तरी, रावळपिंडी कसोटी जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पहिल्या कसोटीत पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांगलेच अडचणीत आणले होते.
पाकिस्तान करेल मालिका विजयाचा प्रयत्न
मालिकेत १-० ने आघाडीवर असलेला पाकिस्तान संघ दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न करेल. मायदेशात प्रथमच कसोटी कर्णधारपद भूषवत असलेला बाबर आझम हा पहिल्यावहिल्या मालिका विजयासाठी प्रयत्नशील आहे. पहिल्या सामन्यात दमदार कामगिरी फवाद आलमकडून संघाला तशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
दुसर्या कसोटीसाठी पाकिस्तान संघः
आबिद अली, इम्रान बट, अझर अली, बाबर आझम (कर्णधार), फवाद आलम, सौद शकील, फहीम अश्रफ, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, सरफराझ अहमद, नौमन अली, साजिद खान, यासिर शाह, हॅरिस रऊफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, तबीश खान
महत्वाच्या बातम्या:
कदाचित भारत ३-० किंवा ४-० फरकाने इंग्लंडला पराभूत करेल, इंग्लंडच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय! पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ