सध्या भारतामध्ये शेतकरी आंदोलनामुळे वातावरण गरम आहे. भारत सरकारने मागील वर्षी पास केलेल्या तीन कृषी विधेयकांना विरोध म्हणून पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर मागील तीन महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनाचा कालावधी वाढत असल्याने अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी देखील या आंदोलनाची दखल घेतली. त्याचवेळी, भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने या मुद्द्यावर ट्विट करत आपले मत मांडले. मात्र, त्यानंतर चाहत्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.
सचिनने केले वादग्रस्त ट्विट
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून अमेरिकन पॉपस्टार रिहाना हिने मंगळवारी (२ फेब्रुवारी) ट्विट केले. त्यामुळे या आंदोलनाची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. त्याचवेळी सचिन तेंडुलकरने रिहानाच्या ट्विटला अप्रत्यक्षरीत्या प्रत्युत्तर देत, ट्विट केले की, ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरचे लोक हे पाहू शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहूया.’
https://twitter.com/sachin_rt/status/1356959311075934215
चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
सचिनचे हे ट्विट शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे म्हणत अनेकांनी त्याला धारेवर धरले. एका चाहत्याने लिहिले,
‘खेळाडू म्हणून सचिन महान आहे मात्र माणूस म्हणून खूपच छोटा.’
खेळाडू म्हणून सचिन महान आहे.
पण,
माणूस म्हणून छोटा.
खूपच छोटा.ह्या ट्विटमुळे त्याने नेमकं काय गमावलं आहे हे कळायला त्याला खूप काळ जाईल.
— Aman Tiwari (@amantiwari1616) February 3, 2021
दुसऱ्या एका ट्विटर हँडलवरून सचिनच्या ट्विटखाली टिप्पणी केली गेली की, ‘मी तुझी मोठी चाहती होते पण आज तू खूप निराश केले.’ अन्य एका चाहत्याने ट्विट करत म्हटले, ‘तुझ्याकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती.’
Apse ye umeed nhi thi sir
— SoIana (@EventNotify268) February 3, 2021
एका चाहत्याने तर याचा संबंध राहुल द्रविडने २००४ मध्ये पाकिस्तान दौर्यावर भारतीय संघाचा डाव घोषित केलेल्या वादग्रस्त घटनेशी जोडला. त्या चाहत्याने लिहिले, ‘त्यादिवशी राहुल द्रविडने डाव घोषित करून आपण बरोबर असल्याचे दाखवून दिले होते.’
Rahul Dravid was right when he declared that day.
— Yash. (@Datascientist3_) February 3, 2021
भारतात सुरू आहे शेतकरी आंदोलन
भारत सरकारने मागील वर्षी पारित केलेली तीन कृषी विधेयके वादात सापडली आहेत. त्याला विरोध म्हणून उत्तर भारतातील प्रामुख्याने पंजाब मधील शेतकरी आक्रमक झालेले दिसतायेत. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडील योगराज सिंग तसेच युवा सलामीवीर शुबमन गिल याच्या परिवाराने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
कदाचित भारत ३-० किंवा ४-० फरकाने इंग्लंडला पराभूत करेल, इंग्लंडच्या दिग्गजाची भविष्यवाणी
ऑस्ट्रेलियन भूमीवरील भारताचा विजय अतुलनीय! पाहा कोणी केलंय कौतुक
इंग्लिश गोलंदाजांचा सामना करण्यासाठी किंग कोहलीची जय्यत तयारी, पाहा व्हिडिओ





