श्रीलंका आणि पकिस्तान यांच्यात आशिया चषक 2022 चा अंतिम सामना रविवारी म्हणजेच 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. सुपर फोरच्या शेवटच्या सामन्यात देखील हे दोन संघ आमने सामने आले होते. उभय संघातील हा सामना शुक्रवारी (9 सप्टेंबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर खेळला गेला, जो श्रीलंकेने 5 विकेट्स राखून जिंकला. श्रीलंकन संघाने सुपर फोरमधील चारही सामने जिंकून अंतिम सामन्यात जागा पक्की केली आहे. तत्पूर्वी त्यांचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याने पाकिस्तानचे माजी दिग्गज वसीम अक्रम यांच्याकडून काही सल्ले घेतले आहेत.
आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) चा अंतिम सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. अंतिम सामन्यापूर्वी शुक्रवारी श्रीलंकन संघाने पाकिस्तानला मात दिल्यानंतरचा एक खास व्हिडिओ सध्या समोर आला आहे. व्हिडिओत पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) श्रीलंकेच्या दिलशान मदुशंका (Dilshan Madushanka) याला गोलंदाजीचे सल्ले देताना दिसत आहेत. मदुशंकाही माजी दिग्गजाकडून मिळणारे सल्ले लक्षपूर्वक ऐकताना दिसत आहे. श्रीलंका क्रिकेटने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
🎥 Words of wisdom from @wasimakramlive for young Dilshan Madushanka. 😍#RoaringForGlory pic.twitter.com/3TdDq5jaBj
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 10, 2022
दरम्यान, मदुशंकाने आशिया चषक 2022 मध्ये त्याच्या भेदक गोलंदाजाच्या जोरावर चांगलाच प्रभाव पाडला आहे. त्याने या आशिया चषकाच्या चालू हंगामात खेळलेल्या 5 सामन्यांमध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 7.70 होता. त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन 24 धावा खर्च करून 3 विकेट्स राहिले आहे. सुपर फोरमध्ये पाकिस्तानला मात दिल्यानंतर श्रीलंकन संघाचे पुढचे लक्ष्य अंतिम सामना जिंकून आशिया चषकाची 6 वे विजेतेपद पटकावण्यावर आहे.
यातून निवडली जाणार दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
श्रीलंका –
दासुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणतिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजय डी सिल्वा, वनिन्दु हसरंगा, महेश तीक्षणा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, दिनेश चांदीमल.
पाकिस्तान –
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमां, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन, हसन अली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मास्टर ब्लास्टरचा संघ मैदानात राजा घलण्यासाठी सज्ज! वाचा कधी आणि कुठे पाहता येणार विशेष सामना
ASIA CUP: पाकिस्तानला हरवण्याचे षडयंत्र रचण्यात वसीम अकरमचा हात, पाहा संपूर्ण व्हिडिओ
राणी एलिझाबेथशी हस्तांदोलन करणाऱ्या ‘त्या’ व्यक्तीचे पवार घराण्याशी जवळचे नाते; खासदार सुळेंनी शेअर केला फोटो