---Advertisement---

थोडक्यात स्टेडियमबाहेर जाण्यापासून हुकला विंडिज फलंदाजाचा चेंडू; पुढे पाकिस्तानी गोलंदाजाने जे केले, ते पाहाच

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 11:28 PM
Brandon-King-Against-Pak-Bowler
---Advertisement---

पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज (pakistan vs west indies t20 series) यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची टी-२० मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी (१६ डिसेंबर) कराचीमध्ये खेळला गेला. पाकिस्तानने या सामन्यात सात विकेट्स आणि सात चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यातील विजयासोबतच पाकिस्तानने मालिका ३-० अशा मोठ्या फरकाने जिंकली. सामन्यादरम्यान वेस्ट इंडीजचा सलामीवीर फलंदाज ब्रँडन किंग (brandon king) आणि पाकिस्तानचा युवा गोलंदाज मोहम्मद वसीम (mohammad wasim) यांच्यात जबरदस्त चढाओढ पाहायला मिळाली.

वेस्ट इंडीजने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. वेस्ट इंडीजच्या डावात सहाव्या षटकात पाकिस्तानचा २० वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम जुनियर गोलंदाजी करण्यासाठी आला होता. वसीमच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सलामीवीर फलंदाज बँडन किंगने एक जबरदस्त षटकार मारला. किंगने मारलेला हा षटकात स्टेडियमच्या छतावर गेला. बॅट आणि चेंडूतील टायमिंग जर थोडी अजून योग्य असती तर नक्कीच हा चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला असता.

किंगने पाचव्या चेंडूवर मारलेल्या या षटकारानंतर वसीमने मात्र जोरदार पुनरागमन केले. षटकातील सहाव्या चेंडूवर वसीमने किंगला तंबूत पाठवले. षटकातील शेवटच्या चेंडू किंगने ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाही आणि चेंडू थेट ऑफ स्टंपला जाऊल लागला. किंगची विकेट घेऊन वसीमने त्याला मागच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराचा चांगल्या प्रकारे बदला घेतला.

दरम्यान, वेस्ट इंडीजने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने तीन विकेट्सच्या नुकसानावर २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने हे लक्ष्य १८.५ षटकात आणि तीन विकेट्सच्या नुकसानावर गाठले.

वेस्ट इंडीजसाठी सलामीवीर ब्रँडन किंगने २१ चेंडूत ४३ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तर दुसरीकडे किंगची विकेट घेतलेल्या मोहम्मद वसीमचे प्रदर्शन पाहिले तर, त्याने चार षटकात ४४ धावा दिल्या आणि दोन विकेट घेतल्या.

महत्वाच्या बातम्या –

हेड कोच द्रविड यांच्या ‘त्या’ पाऊलानंतर उपस्थित झाले प्रश्न; रोहितसोबत वेगळं वागले, तर विराटसोबत वेगळं

राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: महाराष्ट्राची गाठ आता तमिळनाडूशी

आता सचिनही करणार बीसीसीआयमध्ये एन्ट्री? गांगुली यांचे सूचक वक्तव्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---