---Advertisement---

Video: झिम्बाब्वेच्या फिरकीपटूने टाकला रहस्यमयीन चेंडू अन् उडाली दांडी, फलंदाज स्तब्ध होऊन पाहतंच राहिला

On: शुक्रवार, एप्रिल 23, 2021 8:18 AM
---Advertisement---

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात हरारे येथे खेळल्या जाणार्‍या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेला ११ धावांनी पराभूत केले. यासह पाकिस्तानने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात झिम्बाब्वेचा फिरकी गोलंदाज वेस्ले माधेवरेने फेकलेल्या एका चेंडूची सर्वत्र चर्चा होत आहे.

या सामन्यातील पाकिस्तानच्या फलंदाजी वेळी सातव्या षटकात माधवेरे गोलंदाजीसाठी आला. तेव्हा पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज फखर जमान खेळपट्टीवर होता. पण या षटकांतील दुसरा चेंडू माधवेरेने फिरकी चेंडू टाकला आणि फखर जमान फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्याने टाकलेला हा फिरकी चेंडूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

माधवेरेने टाकलेला हा चेंडू इतका तल्लख होता की, बाद झालेला फखर खेळपट्टीवर उभा राहून त्याच्याकडे पाहतच राहिला. इतकेच नाही तर तंबूत परत जाण्यापूर्वीही बराच काळ तिथे उभा राहिला आणि खेळपट्टी पाहात राहिला. जणू काही फखरला आपण बाद झालोय यावरती विश्वासच बसत नव्हता.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 गडी गमावून 149 धावा केल्या. यामध्ये मोहम्मद रिझवानने नाबाद 82 धावा केल्या. परंतु लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या झिम्बाब्वेचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 138 धावा करण्यास सक्षम ठरला. त्यामुळे त्यांचा 11 धावांनी पराभव झाला.

महत्त्वाच्या बातम्या-

बाबा नंबर १! अर्धशतक झळकावल्यानंतर विराटचं मन जिंकणारं सेलिब्रेशन, लाडक्या लेकीला केलं समर्पित 

कोलकाताने संघातून बाहेर काढल्यानंतर या खेळाडूने चेन्नईविरुद्धच्या पराभवानंतर केली रसेलची थट्टा, पाहा काय म्हणाला

सॅम करनने वादळी खेळी करणाऱ्या रसेलला बाद करण्यामागे होती धोनीची योजना? स्वत: कर्णधारानेच केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---