सध्या आयसीसी महिला विश्वचषक २०२२(ICC Womens World cup 2022) सुरू आहे. यावर्षीचा महिला विश्वचषक न्यूझीलंडमध्ये खेळला जात आहे. शुक्रवारी (११ मार्च) पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ (Pakistan vs South Africa) आमने- सामने आले होते. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ६ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात आफ्रिका संघाने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्स गमावत २२३ धावा केल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तान संघाचा पराभव झाला असला, तरी यष्टीरक्षक सिद्रा नवाजचा झेल पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
पाकिस्तान महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघामध्ये पार पडलेल्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानी खेळाडू सिद्रा नवाजने घेतलेला झेल पाहून चाहत्यांना भारतीय माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीची (MS Dhoni) आठवण झाली. आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम आकाऊंटवर नवाजच्या झेलचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/Ca8g_oWIgpd/?utm_source=ig_embed&ig_rid=41bc6186-1f7e-4635-ab67-83c49ffdc94e
डायना बेगच्या चेंडूवर सिद्राने दक्षिण आफ्रिकेची फलंदाज तजमिन ब्रिट्सचा जबरदस्त झेल घेतला. बिट्सने मारलेला चेंडू फर्स्ट स्लिपकडे जात होता, तेव्हा सिद्राने डाव्या बाजूला फुल लेंथ डाईव्ह लगावला आणि शानदार झेल घेतला. आयसीसीने यावर कमेंट करत लिहिले आहे की, “वाॅट अ कॅच.” या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत धोनीच्या २०१९ च्या विश्वचषकाची आठवन करून दिली आहे. नैना बिदी यांनी “ब्युटी,” असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
WATCH: Relive some of @msdhoni's magic moments from the game against West Indies in Manchester 🎬🎬😎🇮🇳🇮🇳 #TeamIndia #CWC19 #WIvIND
Do not miss that breathtaking catch 👌👌
Watch the full video here 👉👉📽️📽️ https://t.co/T2mgBwnZqb pic.twitter.com/ybjdoAALEt
— BCCI (@BCCI) June 29, 2019
सन २०१९ च्या विश्वचषकावेळी भारतीय कर्णधार एमएस धोनीने वेस्ट इंडिजविरुद्ध असाच एक झेल घेतला होता. धोनीने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर कार्लोस ब्रेथवेटचा झेल डाव्या बाजूला डाईव्ह करून एका हाताने घेतला होता. धोनी जगातील सर्वश्रेष्ट यष्टीरक्षकांपैकी एक आहे. २०१९ विश्वचषक हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा विश्वचषक होता. यानंतर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेतला. त्याने १५ ऑगस्ट, २०२० ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करत २२३ धावा केल्या होत्या. या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तान महिला संघ २१७ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे. या अगोदर संघाला भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना गमवावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मलिंगा इज बॅक! यावर्षी मुंबई नव्हेतर ‘या’ संघाला देणार धडे
विश्वचषकात पाकिस्तान महिला संघाकडून मोठी चूक; एकाच षटकात टाकले ‘इतके’ चेंडू
मोहाली कसोटीचा नायक जडेजाला दुसऱ्या सामन्यात विश्रांती? उपकर्णधार बुमराहने सांगितले…