---Advertisement---

पाकिस्तानच्या सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटूची आईदेखील उतरली क्रिकेटच्या मैदानात; मुलीने पोस्ट करत लिहिले…

On: रविवार, ऑक्टोबर 2, 2022 5:25 PM
---Advertisement---

बांगलादेश येथे नुकतीच महिला आशिया चषकाला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारत व पाकिस्तानने विजय साजरे केले. पाकिस्तानने सलामीच्या सामन्यात मलेशियाला पराभूत करत विजय सुरुवात केली. दुसरा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात झाला. या सामन्यात मात्र एक ऐतिहासिक घटना पाहायला मिळाली. पाकिस्तान संघाची अनुभवी खेळाडू कायनात इम्तियाज तिची आई या सामन्यात पंच म्हणून पदार्पण करत होती. स्वतः कायनातने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबत माहिती दिली.

भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 41 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात सलमा इम्तियाज यांनी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. सलमा या पाकिस्तानची अनुभवी गोलंदाज कायनात इम्तियाज हिच्या आई आहेत. कायनातला मलेशियाविरुद्धच्या सामन्यात मात्र खेळण्याची संधी मिळाली नव्हती.

https://www.instagram.com/p/CjKsrQkhC12/?igshid=YmMyMTA2M2Y=

 

आपल्या आईला आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी करताना पाहून कायनात भलतीच खुश झाली. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले,
“माझी आई महिला आशिया चषक 2022 मध्ये पंच म्हणून काम करत आहे. मला तिचा खूप अभिमान असून, ती खूप प्रेरणादायी व्यक्ती आहे. मी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याचे तीचे नेहमीच स्वप्न होते. ते स्वप्न आज ती स्वतः ही जगत आहे. इतक्या दिवसांनी आज जाऊन त्यांना ही संधी मिळाली. आम्ही पाकिस्तानच्या मुलींचे प्रतिनिधित्व करत आहोत.”

कायनात इम्तियाज हिच्याबद्दल बोलायचे झाले तर तीने वयाचा 18 व्या वर्षी 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. मात्र, ती सातत्याने संघाच्या आत बाहेर होते. त्यामुळे ती आजवर केवळ 15 सामने खेळू शकली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहच्या फिटनेसविषयी चांगली बातमी; स्ट्रेस फ्रॅक्चर नाही, ‘ही’ साधी दुखापत झालीये
INDvSA: किंग कोहलीच्या खास यादीत समाविष्ट होण्याची सूर्याला संधी! केवळ एवढ्याच धावांची आवश्यकता
INDvSA: फॅन्ससाठी वाईट बातमी, दुसरा टी20 सामना होणार रद्द?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---