इमर्जिंग एशिया कप 202 3चा अंतिम सामना भारत अ आणि पाकिस्तान अ संघात खेळला जात आहे. रविवारी (23 जुलै) हा सामना सुरू होण्याआधी भारतीय संघाचा कर्णधार यश धूल याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवत पाकिस्तान संघाने तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघासमोर विजयासाठी 353 धावांचे आव्हान ठेवले. मध्यफळीतील आक्रमक फलंदाज तय्यब ताहीर याने झळकावलेले वेगवान शतक पाकिस्तानच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.
साखळी फेरीत पाकिस्तानला भारताकडून पराभूत व्हावे लागले होते. मात्र, या अंतिम सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर सर्व गोष्टी पाकिस्तानच्या बाजूने घडल्या. सलामीवीर सईम आयुब व साहेबजादा फरहान यांनी वेगवान सुरुवात करताना, भारतीय वेगवान गोलंदाजांवर हल्ला चढवला. दोघांनीदेखील आपापली अर्धशतके पूर्ण करत भारतीय संघावर दबाव आणला. दोघांनी पहिल्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर पाकिस्तान संघाचा डाव काहीसा घसरला. परागच्या गोलंदाजीने पाकिस्तानने आपले पाच फलंदाज 187 धावांमध्ये गमावले. मात्र, त्यानंतर तय्यब ताहिरने केवळ 66 चेंडूंमध्ये शतक ठोकत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले.
त्याने केवळ 71 चेंडूंमध्ये 12 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 108 धावा केल्या. यानंतर तळाच्या फलंदाजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने पाकिस्तान संघाने 50 षटकात 352 धावांपर्यंत मजल मारली. भारतीय संघाकडून राजवर्धन हंगरगेकर व रियान पराग यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
(Pakistan A Set 353 Target Against India A At Emerging Asia Cup Final)
आणखी वाचा:
पाकिस्तानविरुद्धच्या फायनलची नाणेफेक भारताच्या पारड्यात! टीम इंडिया करणार प्रथम गोलंदाजी, पाहा प्लेइंग इलेव्हन
पंचांशी वाद पडला महागात, पुढचे 24 महिने हरमनप्रीतला सावध रहावं लागणार