आशिया चषक २०२२ चे बिगूल वाजले असून सर्व आशियाई संघ या स्पर्धेच्या तयारीला लागले आहेत. आशिया चषकातील महामुकाबला अर्थात भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामना रविवारी (२८ ऑगस्ट) दुबई स्टेडियममध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघात मोठा बदल करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषकासाठी उमर राशिद यांना संघाच्या साहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त केले आहे. मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट यांना ते मदत करतील.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) लाहोरमधील आपल्या राष्ट्रीय उच्च कार्यक्षमता केंद्रातील गोलंदाजी प्रशिक्षक उमर राशिद (Umer Rashid) यांना टेट यांच्या मदतीसाठी युएईला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांच्या शिफारशीनंतर त्यांची नियुक्ती केली गेली आहे. बुधवारी (२४ ऑगस्ट) ते पाकिस्तान संघासोबत जोडले जाण्यासाठी युएईला रवाना झाले आहेत.
उमर राशिद मुख्यत: २२ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) याच्यासोबत काम करतील. हसनैनला अनुभवी वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीच्या जागी पाकिस्तान संघात सहभागी केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, “मोहम्मद हसनैन संघात नवीन आहे. त्यामुळे नवे साहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक उमर राशिद त्याच्या गोलंदाजी ऍक्शनवर लक्ष ठेवतील. कारण त्यांनी यापूर्वीही हसनैनच्या वेगवान गोलंदाजी ऍक्शनवर काम केले होते. यावर्षाच्या सुरुवातीला हसनैनच्या गोलंदाजी ऍक्शनला अवैध म्हटले गेले होते, तेव्हा उमर राशिद यांनीच त्याला मदत केली होती. तसेच शॉन टेट ऑस्ट्रेलियन आहेत. त्यामुळे टेट आणि पाकिस्तानी खेळाडूंमधील दुवा म्हणूनही ते काम करतील.”
आशिया चषक २०२२साठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर ., नसीम शाह, शाहनवाज धानी, उस्मान कादिर आणि मोहम्मद हसनैन.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
इरफान पठाणला एयरपोर्टवर वाईट वागणूक, पत्नी अन् मुलांसमोर झाला अभद्र व्यवहार
‘असं लग्न करू शकत नाही!’ केएल राहुल- आथिया शेट्टीच्या नात्यावर सुनिल शेट्टीने नोंदवली हरकत
अल्टिमेट खो खो स्पर्धेत ओडिशा जगरनॉट्स रोखली चेन्नई क्विक गन्सची विजयी घौडदौड




