पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज (Mohammad Hafeez) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Mohammad Hafeez Retired From International Cricket) जाहीर केली आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान त्याने आपल्या या निर्णयाची घोषणा केली असल्याचे समजत आहे. ४१ वर्षीय हाफिजसाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा टी२० विश्वचषकातील उपांत्य सामना हा कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला तरीही तो फ्रँचायझी क्रिकेट खेळताना दिसेल.
मोहम्मद हाफिज याची क्रिकेट कारकिर्द
हाफिजने २००३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तेव्हापासून आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ५५ कसोटी सामने खेळताना ३६५२ धावा आणि ५३ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १० शतके, १ द्विशतक आणि १२ अर्धशतके निघाली आहेत. तसेच वनडेत २१८ सामन्यात ६६१४ धावा आणि १३९ विकेट्स व टी२०त ११९ सामन्यात २५१४ धावा आणि ६१ विकेट्सची कामगिरी केली आहे.
चक्क ४० संघांकडून खेळलाय क्रिकेट
याखेरीज त्याने तब्बल ४० वेगवेगळ्या संघांकडून क्रिकेट खेळले आहे. यात पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघासह पाकिस्तान अ, पाकिस्तान इलेव्हन, बलुचिस्तान बियर्स, बलुचिस्तान वॉरियर्स, ढाका डायनामाईट्स, डुरोन्टो राजशाही, एडमंडटन रॉयल्स, फैसलाबाद, फैसलाबाद रिझन, फाटा रिझन, गॅले ग्लॅडियटर्स, गयाना अमेझॉन वॉरियर्स, एम्तियाज अहमद इलेव्हन, खुलना रॉयल बेंगाल्स, कोलकाता नाईट रायडर्स, लाहोर ईगल्स, लाहोर लायन्स, लाहोर कलंदर्स, लाहोर रिझन व्हाईट, मेलबर्न स्टार्स, मिडलसेक्स, मॉन्ट्रियल टायगर्स, मुलतान, नाघरहार लेपर्ड्स, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ग्रीन, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पॅट्रॉन्स इलेव्हन, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड रेड्स, पाकिस्तान ग्रीन्स, पेशावर झाल्मी, पंजाब (पाकिस्तान), पंजाब बादशाहाज, पंजाब स्टॅलियन्स, रावळपिंडी, रेस्ट ऑफ नॉर्थ वेस्ट फ्रंटीयर प्रोवाईन्स, सरगोधा, सदर्न पंजाब, सेंट किट्स नॅवियस पॅट्रियस, सुई गॅस कार्पोरेशन ऑफ पाकिस्तान आणि वायांबा या संघांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! ‘या’ पाकिस्तानी अष्टपैलूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला केला अलविदा, कसोटीत केलंय द्विशतक
जसप्रीत बुमराहला वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्यामागे ‘हे’ आहे कारण, माजी निवडकर्त्याचे स्पष्टीकरण
जोहान्सबर्ग कसोटीत पाऊस घालणार विघ्न, जाणून घ्या ५ दिवस कसे असेल हवामान?