भारतीय क्रिकेट संघ शनिवारी (2 सप्टेंबर) आशिया चषकात आपल्या अभियानाची सुरुवात करेल. श्रीलंकेतील पल्लेकल येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघासमोर पाकिस्तानचे आव्हान असणार आहे. शनिवारी होणाऱ्या या सामन्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा करत माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न केला.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ तब्बल चार वर्षानंतर वनडे क्रिकेटमध्ये आमने-सामने येतील. अखेरच्या वेळी हे दोन्ही संघ 2019 वनडे विश्वचषकात भिडले होते. या बहुप्रतिक्षित सामन्याची सर्वत्र चर्चा असताना पाकिस्तानने शुक्रवारीच आपल्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली. नेपाळ विरुद्ध पहिल्या सामन्यात खेळवलेला संघ पाकिस्तान या सामन्यात मैदानात उतरवेल.
पाकिस्तान संघासाठी फखर झमान व इमाम उल हक ही अनुभवी जोडी सलामीला उतरेल. तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार बाबर आझम तर चौथ्या क्रमांकावर सलमान अली खेळताना दिसेल. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान तर सहाव्या क्रमांकावर फिनिशर इफ्तिखार अहमद खेळेल. त्यानंतर फिरकीपटू तसेच अष्टपैलू खान व मोहम्मद नवाज हे संघाला मजबुती देतील. त्यानंतर पाकिस्तान संघाची ताकद समजले जाणारे शाहीन आफ्रिदी, नसीम शाह व हॅरिस रौफ हे वेगवान गोलंदाज संघाला पूर्ण बनवतील.
पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळचा तब्बल 238 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात बाबर व इफ्तिखार यांनी शतके झळकावलेली. तर, नवाजने चार बळी मिळवलेले.
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ: फखर झमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ व नसीम शाह.
(Pakistan Annouced Playing XI For Asia Cup Clash Against India)
हेही वाचाच-
‘हा’ भारतीय ठेचणार बाबरच्या नांग्या, IND vs PAK सामन्यापूर्वी दिग्गजाची भविष्यवाणी
‘पाकिस्तानी तिकडीविरुद्ध सावधगिरी बाळगावी लागेल’, महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियन दिग्गजाची भारताला चेतावणी






