भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषक २०२१ चा सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. रविवारी (२४ ऑक्टोबर) दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आमने सामने येणार आहेत. या सामन्याच्या एक दिवस आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचा १२ सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील या १२ सदस्यीय संघामध्ये यष्टीरक्षकाच्या रुपात मोहम्मद रिझवानला जागा मिळाली आहे. हाच फलंदाज भारताविरुद्ध आजमसोबत सलामीला फलंदाजीसाठी येऊ शकतो. तसेच आसिफ अली, फखर जमान आणि हैदर अली या फलंदाजांनाही भारताविरुद्ध खेळण्याची संधी मिळेल.
महत्त्वाचे म्हणजे, पाकिस्तानने तब्बल ४ अष्टपैलू खेळाडूंना १२ सदस्यीय संघात ठेवले आहे. यामध्ये अनुभवी शोएब मलिकसह इमाद वसीम, मोहम्मद हाफिज आणि शादाब खान यांचाही समावेश आहे. तसेच गोलंदाजी विभागात हारिस राऊफ, हसन अली आणि शाहिन शाह आफ्रिदी यांना निवडले गेले आहे.
याखेरीज १५ सदस्यीय संघातील मोहम्मद नवाज, सरफराज अहमद आणि मोहम्मद वसीम यांना मात्र भारताविरुद्ध संधी गेलेली नाही.
Pakistan's 12 for their #T20WorldCup opener against India.#WeHaveWeWill pic.twitter.com/vC0czmlGNO
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 23, 2021
भारताविरुद्धच्या लढतीसाठी पाकिस्तानचा १२ सदस्यीय संघ:
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, हैदर अली
महत्त्वाच्या बातम्या-
‘अरे, हा तर चक्क माही’! धोनीला प्रत्यक्षात पाहून युवा पाकिस्तानी गोलंदाज अतिआनंदीत, साधला संवाद
नशीब बलवत्तर! एकाच चेंडूवर ३ वेळा धावबाद होण्यापासून फलंदाज, बघा टी२० विश्वचषकातील ‘कॉमेडी एरर’






