पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात 26 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत दोन कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत अंतिम सामन्यात स्थान मिळण्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान या संघाला त्याच्यात होणार्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करावी लागेल. तत्पूर्वी पाकिस्तान संघाने कसोटी मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरुवातीला कसोटी मालिका खेळली जाईल. या मालिकेत दोन कसोटी सामने खेळले जाणार. या मालिकेतील पहिल्या सामन्याला 26 जानेवारी पासून कराची येथे सुरुवात होणार आहे.
मागील न्यूझीलंड दौऱ्यात पाकिस्तानच्या बर्याच खेळाडूंनी न्यूझीलंड विरुद्ध खराब प्रदर्शन केले होते. त्यामुळे बर्याच खेळाडूंना दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध मायदेशात होणार्या मालिकेसाठी संघात स्थान न देता दुसर्या खेळाडूंना संधी दिली आहे.
मागील दौऱ्यातील 8 खेळाडूंना वगळण्यात आले
न्यूझीलंड विरुद्ध खराब कामगिरीमुळे पाकिस्तान संघाने 8 खेळाडूंना वगळले आहे. यामध्ये शान मसूद, इमाम उल हक, मोहम्मद अब्बास, हॅरिस सोहेल, शादाब खान, जफर गौहर, सोहेल खान आणि नसीम शाह या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार्या कसोटी मालिकेतून डच्चू दिला आहे. त्यांच्या ऐवजी दुसर्या खेळाडूंना संघात देण्यात आले. या खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तान संघाला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या यादीत दक्षिण आफ्रिका संघ ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि इंग्लंड याच्या पाठीमागे पाचव्या स्थानी आहे. तसेच पाकिस्तान संघ सहाव्या स्थानी आहे.
पाकिस्तानचा कसोटी संघ :
बाबर आझम (कर्णधार) मोहम्मद रिजवान, आबिद अली, इमरान बट, अझर अली, फवाद आलम, सरफराज अहमद, फहीम अशरफ, यासिर शाह, शाहीन आफ्रिदी, अब्दुल्ला शफीक, आगा सलमान, सऊद शकील, कामरान गुलाम, साजिद खान, हॅरिस रऊफ, तबिश खान, नौमान अली, हसन अली आणि मोहम्मद नवाज.
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना – 26 ते 30 जानेवारी – कराची
दुसरा कसोटी सामना – 4 ते 8 फेब्रुवारी – रावळपिंडी
पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका
पहिला सामना – 11 फेब्रुवारी – लाहोर
दुसरा सामना – 13 फेब्रुवारी – लाहोर
तिसरा सामना – 14 फेब्रुवारी – लाहोर
महत्त्वाच्या बातम्या –
मोहम्मद अझरुद्दीनची विश लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ गोष्टींचा आहे समावेश