केरळ संघाचा स्टार फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन पुन्हा एकदा या कारणासाठी आला चर्चेत
सध्या मोहम्मद अझरुद्दीनची ही गोष्ट सोशल मीडियावर होते व्हायरल
केरळ संघाचा हा खेळाडू मुंबई विरुद्धच्या कामगिरीने आला होता चर्चेत
कोरोनाच्या महामारीच्या दीर्घ विश्रांतीनंतर देशांतर्गत क्रिकेटला सुरुवात झाली. यामध्ये सर्वात पहिल्यांदा देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेला सुरुवात झाली ही स्पर्धा 10 जानेवारी पासून सुरू झाली आहे. या स्पर्धेतील प्रत्येक दिवशी नवीन थरार बघायला मिळत आहे. त्यापैकी मुंबई आणि केरळ संघात झालेल्या सामन्यात केरळ संघाच्या मोहम्मद अझरुद्दीन या 26 वर्षीय सलामीवीराने नाबाद शतकीय खेळी करत केरळ संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर त्याच्या या खेळीची खूप चर्चा झाली होती. मात्र तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता त्याच्या खेळीने नाही दुसर्या कारणाने चर्चेत आला आहे.
मोहम्मद अझरुद्दीन मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर चर्चेत आला आहे. त्याने मुंबई विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई संघाच्या गोलंदाजांची दमदार धुलाई केली. या सामन्यात त्याने फक्त 37 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्यांनंतर मोहम्मद अझरुद्दीन 54 चेंडूत नाबाद 136 धावांची खेळी करत आपल्या केरळ संघाला विजय मिळवून दिला. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 11 षटकारांची आतिषबाजी केली. त्यानंतर तो रातोरात चर्चेत आला. त्याचे अल्पावधीत चाहते निर्माण झाले.
मोहम्मद अझरुद्दीन आता पुन्हा एकदा चर्चेत आला तो सोशल मीडियावर त्याची विश लिस्ट व्हायरल झाल्याने. या विश लिस्टमध्ये त्याने आपल्या भविष्यात पूर्ण करण्यासाठी रंगवलेल्या स्वप्नांची यादी आहे. या यादीतील त्याची पहिली इच्छा आहे की, कोणत्याही संघासाठी आयपीएल 2021 च्या स्पर्धेत खेळायचे आहे. त्यानंतर 2023 साली भारतात होणार्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करायचे आहे. त्याचबरोबर त्याला रणजी करंडक स्पर्धेत एका हंगामात 4 शतके ठोकायची आहे.
Kerala's star Mohammed Azharuddeen has set his goals at his house. pic.twitter.com/9eeLEB2QbT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 15, 2021
मोहम्मद अझरुद्दीनच्या विश लिस्टमध्ये एक घर खरेदी करण्याची इच्छा देखील लिहिली आहे. त्याचबरोबर मर्सिडीज बेंज ही गाडी या स्वत:च्या मालिकेची असावी अशी एक इच्छा आहे. मुंबई विरुद्ध दमदार कामगिरी केल्यानंतर तो सर्व दिग्गज खेळाडूंच्या नजरेत आला होता. त्यावर बर्याच आजी- माजी खेळाडूने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. तसेच भारतीय संघाचे विस्फोट फलंदाज विरेंद्र सेहवाग यांनी सुद्धा त्याच्या खेळीचे कौतुक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –





