---Advertisement---

वेस्ट इंडिज, इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तानी संघ जाहीर; मोईन खान यांच्या मुलाला मिळाली संधी

On: शनिवार, जून 5, 2021 9:11 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. इंग्लंड दौर्‍यावर पाकिस्तान संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. यानंतर वेस्ट इंडीज दौर्‍यावर पाच टी -20 आंतरराष्ट्रीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.

पाकिस्तानच्या निवड समितीने आगामी सामन्यांसाठी काही अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. संघात तसेच संघात काहीसा बदल करण्यात आला आहे. याबरोबरच काही नवीन चेहऱ्यांना पाकिस्तान निवड समितीने संधी दिली आहे.

मधल्या फळीतील फलंदाज हॅरिस सोहेल एकदिवसीय संघात परतला आहे. तर इमाद वसीमचा टी -२० संघात समावेश झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुखापतीमुळे खेळून न शकलेला सौद शकीलला वनडे मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे.

सलमान अलीने वनडे संघात स्थान मिळवले आहे, पण कसोटी संघातून त्याला वगळण्यात आले आहे . 22 वर्षीय पॉवर हिटर आझम खानला पदार्पण करण्याची संधी देण्यात असेल, तो पाकिस्तानेच माजी क्रिकेटपटू मोईन खान यांचा मुलगा आहे.  या युवा खेळाडूचा पाकिस्तानच्या टी -20 आंतरराष्ट्रीय संघात समावेश करण्यात आला आहे.

जर यासिर शाहा फिट असला तर त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तो गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघा बाहेर होता. लाहोर येथे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया चालू आहे.

पाकिस्तानचा इंग्लंड दौरा ८ ते २० जुलै दरम्यान असणार आहे. तर वेस्ट इंडिज दौरा २७ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

असे आहे पाकिस्तान संघ 

एकदिवसीय संघ – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, फहीम अशरफ, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रऊफ, हॅरिस सोहेल, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (यष्टीरक्षक), सलमान अली आघा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी आणि उस्मान कादीर.

टी20 संघ – बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अरशद इक्बाल, आजम खान, फहीम अशरफ, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीझ, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), शाहीन शाह आफ्रिदी, शर्जील खान आणि उस्मान कादीर.

कसोटी संघ – बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, आबिद अली, अझर अली, फहीम अशरफ, फवाद आलम, हॅरिस रऊफ, हसन अली, इम्रान बट, मोहम्मद अब्बास शाह नवाज, मोहम्मद., नौमन अली, साजिद खान, सरफराज अहमद (यष्टीरक्षक), सौद शकील, शाहीन शाह आफ्रिदी, शाहनवाज डहानी, यासिर शाह (फिटनेसवर अवलंबून) आणि जाहिद महमूद.

महत्वाच्या बातम्या

‘असा’ होता भारतीय संघाचा मुंबई ते साउथॅम्प्टन प्रवास; आता ३ दिवस राहावे लागणार क्वारंटाईन

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ‘अशी’ असेल भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रवी शास्त्रींच्या ‘या’ शब्दांमुळे वडिलांच्या निधनानंतरही मोहम्मद सिराजने केली उल्लेखनीय कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---