पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. अर्शद नदीमने या खेळात भारताच्या नीरज चोप्राला मागे सोडले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अर्शद नदीमने पाकिस्तानचा 32 वर्षांचा ऑलिम्पिकमधील पदकांचा दुष्काळ संपवण्याचे काम केला आहे. पाकिस्तानने यापूर्वी 1992 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते.
बार्सिलोना ऑलिम्पिक 1992 मध्ये पाकिस्तानने हॉकीमध्ये कांस्यपदक जिंकले होते. बार्सिलोना ऑलिम्पिक 1992 मध्ये पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर पाकिस्तानला एकही पदक मिळालेले नाही. पाकिस्तान सरकारने स्टार ॲथलीट अर्शद नदीमला 50 दशलक्ष पाकिस्तानी रुपये (सुमारे 1.5 कोटी भारतीय रुपये) बक्षीस जाहीर केले आहे. अर्शद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पाकिस्तानसाठी सुवर्णपदक जिंकले. कराचीचे मुर्तझा वहाब यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर ही घोषणा केली आहे.
Prizes Announced for Arshad Nadeem so far:
50,000 US Dollars by Olympic Association for Winning Gold.
Apartment in ARY Laguna city from ARY News owner Salman Iqbal.
50 Million by Sindh Government Mayor Karachi Murtaza Wahab.
5 Millions by United Bank Limited Pakistan.
— Nawaz 🇵🇰 (@Rnawaz31888) August 9, 2024
कराचीचे महापौर मुर्तझा वहाब यांनी ‘एक्स’वर लिहिले, ‘अभिनंदन अर्शद सुदैवाने, मला या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची संधी मिळाली. 40 वर्षांनंतर पाकिस्तानला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळाले. सिंध सरकार अर्शदला 50 दशलक्ष रुपये देईल, कराचीचे महापौर मुर्तझा वहाब म्हणाले की कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन (केएमसी) प्रांतीय राजधानीत ‘अर्शद नदीम ॲथलेटिक्स अकादमी’ स्थापन करणार आहे. तत्पूर्वी, अर्शद नदीमच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी देशाचे अभिनंदन केले.
हेही वाचा-
टोकियो ते पॅरिस… गोल्ड आणि सिल्वर! नीरज चोप्रा कसा बनला ऑलिम्पिकमधील भारताचा सर्वात मोठा ॲथलीट?
युवराज सिंगचा शिखर धवन सोबत “चीन, टपक, डम डम”, पाहा मजेशीर VIDEO
नीरज चोप्रा फायलनमध्ये दुखापतीसह खेळत होता, उघड केलं मोठं गुपित!