संयुक्त अरब अमीराती (युएई) येथे २७ ऑगस्टपासून आशिया चषक सुरू होत आहे. स्पर्धेचा दुसऱ्या दिवशी रोजी दुबईत भारत आणि पाकिस्तान आशिया चषकातील आपला पहिला सामना खेळणार आहेत. गेल्या वर्षी युएईमध्ये झालेल्या टी२० विश्वचषकानंतर उभय संघांमधील हा पहिलाच सामना असेल. दोन देशांमधील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून बंद आहे. आयसीसीच्या स्पर्धेतच या दोन संघांमध्ये सामने होत असतात. अशा परिस्थितीत दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते आशिया चषकात होणाऱ्या या हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. स्पर्धेला सुरुवात होण्यास अवघ्या चार दिवसांचा अवधी शिल्लक असताना, पाकिस्तानचा फिनिशर आसिफ अलीने एक मोठे वक्तव्य केले आहे.
आशिया चषकासाठी रवाना होण्यापूर्वी, पाकिस्तानचा फिनिशर आसिफ अली पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची संवाद साधत होता. त्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला, “मी ज्या स्थानावर फलंदाजी करतो, तेथून प्रत्येक षटकात १० धावांची आवश्यकता असते. यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळायला यायला हवेत. मी त्यासाठी सराव करत आहे. मी दररोज १५० षटकार मारण्याचा सराव करतो, जेणेकरून सामन्यात ४-५ षटकार मारता येतील. मी चेंडूनुसारच फलंदाजी करण्यावर विश्वास ठेवतो. एकदा यश मिळाले म्हणून एकच फटका पुन्हा पुन्हा खेळण्याचा विचार मी कधी करत नाही. सर्व काही सामन्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.”
आसिफ अली हा पाकिस्तानचा पॉवर हिटर व फिनिशर मानला जातो. तो सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. २०२१ च्या टी२० विश्वचषकात आसिफ अलीने फटकेबाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आसिफने त्या स्पर्धेत केवळ २४ चेंडू खेळले. त्यात ७ षटकार आणि एक चौकार लगावला होता. त्याची सरासरी ५७ आणि स्ट्राइक रेट २३७ इतका होता. न्यूझीलंड व अफगाणिस्तानविरुद्धची त्याची खेळी पाकिस्तानला उपांत्य फेरीत घेऊन गेली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण






