पाकिस्तानने सुपर फोरमधील पहिल्याच सामन्यात बांगलादेशला पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानने या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 193 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 39.3 षटकांमध्ये 3 विकेट्सच्या नुकसानावर 194 धांवा केल्या आणि सामना नावावर केला. हॅरिस रौफ सामनावीर ठरला, ज्याने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. फलंदाजांमद्ये ईमाम-उल-हक आणि मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतके केली.
बांगलादेशने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. पण संघ आपल्या वाटाची 50 षटके खेळू शकला नाही. बांगलादेशने 38.4 षटकांमध्ये 193 धावा केल्या. यात कर्णधार शाकिब अल हसन याने 54 आणि मुशफिकूर रहीम याने 64 धावा केल्या. पाकिस्तानसाठी गोलंदाजांमध्ये हॅरिस रौफ सर्वात यशस्वी ठरला. रौफने 6 षटकात 19 धावा खर्च करून 4 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. नसीम शाह दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. नसीमने 5.4 षटकांमध्ये 3 विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ फलंदाजी आल्यानंतर सलामीवीर ईमान-उल-हक याने 84 चेंडूत 78 धावांची खेळी केली. ईमानला साथ मिळाली यष्टीरक्षक मोहम्मद रिझवान याची. रिझवानने 79 चेंडूत 63 धावांची खेळी केली. या दोघांच्या वादळी खेळीमुळे पाकिस्ताननने 10 पेक्षा अधिक षटके आणि 7 विकेट्स राखून विजय मिळवला. (Pakistan beat Bangladesh by seven wickets at the Gaddafi Stadium)
पाकिस्तान विरुद्ध बांगलादे सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन –
पाकिस्तान – फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ.
बांगलादेश – मोहम्मद नईम, मेहिदी हसन मिराझ, लिटन दास, तौहिद हृदोय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
बातमी अपडेट होत आहे –
महत्वाच्या बातम्या –
Asia Cup 2023 । हॅरिस रौफचा नवा विक्रम! सुपर फोर फेरीत बनला ‘अशी’ कामगिरी करणारा तिसरा खेळाडू
बांगलादेश 200च्या आत सर्वबाद, सुपर फोरमध्येही पाकिस्तानची भेदक गोलंदाजी कायम