श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत पाहुण्या पाकिस्तान संघाने 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. कोलंबो येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीच पाकिस्तानने एक डाव आणि 222 धावांनी मोठा विजय मिळवला. यासह पाकिस्तानने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान भक्कम केले.
पहिल्या कसोटी सामन्यात पुनरागमन करत शानदार विजय मिळवलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत एकतर्फी वर्चस्व गाजवले. अब्रार अहमद व नसीम शाह यांनी केलेल्या शानदार गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा पहिला डाव केवळ 166 धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर पाकिस्तानने सर्वच फलंदाजांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. अब्दुल्ला शफीक याने 201 धावांची खेळी केली. तर, सलमान आगा याने शतकी खेळी करत त्याला साथ दिली. या व्यतिरिक्त शान मसूद, सौद शकील व मोहम्मद रिझवान यांनी अर्धशतके केल्यामुळे पाकिस्तानने तब्बल 576 धावा उभ्या केल्या.
ही मोठी पिछाडी भरून काढण्यासाठी दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरलेल्या श्रीलंकेच्या फलंदाजांना सूर गवसला नाही. अनुभवी ऍंजलो मेथ्यूज याने झळकावलेले एकमेव अर्धशतक श्रीलंकेच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. पाकिस्तानसाठी दुसऱ्या डावात नोमन अली याने साथ तर नसीम शहा याने तीन बळी मिळवत श्रीलंकेचा डाव केवळ 188 धावांवर संपुष्टात आणला. अब्दुल्ला शफिक याला मालिकावीर तर सलमान आगा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. या विजयामुळे पाकिस्तानने जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-2025 क्रमवारीत 100% सरासरीसह पहिले स्थान कायम राखले.
(Pakistan Beat Srilanka In Colombo Test By Innings And 222 Runs)
महत्त्वाच्या बातम्या-
वर्ल्डकप खेळणार का? वनडे रिटायरमेंट घेतलेला स्टोक्स पाहा काय म्हणाला?
आजपासून टीम इंडियाचे ‘मिशन वर्ल्डकप’! वाचा भारतीय संघाचे विश्वचषकापर्यंतचे सर्व वेळापत्रक