वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान या संघांमध्ये ४ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना शनिवारी (३१ जुलै) पार पडला, ज्यामध्ये वेस्ट इंडिज संघाला ७ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरोन पोलार्ड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाकडून कर्णधार बाबर आजमने तुफान फटकेबाजी केली. त्याने ४० चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ५१ धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिजवाननेही ३६ चेंडुंमध्ये २ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ४६ धावांची खेळी केली होती.
तर वेस्ट इंडिज संघाकडून एकट्या जेसन होल्डरने ४ षटके गोलंदाजी करत २६ धावा देत ४ गडी बाद केले. पाकिस्तान संघाला २० षटक अखेर ८ बाद १५७ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाकडून एकट्या निकोलस पुरनने अखेरपर्यंत झुंज दिली. परंतु ही झुंज व्यर्थ ठरली. त्याने अवघ्या ३३ चेंडूंमध्ये ६ षटकार आणि ४ चौकरांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी केली. तर एविन लुईसने ३५ धावांचे योगदान दिले होते. हा सामना पाकिस्तान संघाने ७ धावांनी आपल्या नावावर केला. यासह पाकिस्तानने टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. (Pakistan beat West Indies by 7 runs babar & hafeez played crucial role)
हफीजच्या दुसऱ्याच चेंडूवर फ्लेचरची दांडी गुल
पाकिस्तान संघाकडून पहिलेच षटक टाकण्यासाठी मोहम्मद हफीज गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर हफीजने आंद्रे फ्लेचरला बाद करत माघारी धाडले. या सामन्यात वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल पूर्णपणे फ्लॉप ठरला. संघाला त्याची आवश्यकता असताना तो अवघ्या १६ धावा करत माघारी परतला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
चला जरा फिरूया! मायदेशी परतताच या खास ठिकाणाला धवनने दिली भेट; चाहत्यांसोबत फोटोही काढले
विंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेत पाकिस्तानी फलंदाजाचा टी२०त ‘विश्वविक्रम’, रोहित-धवनलाही पछाडलं
आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या आपल्या दोन्ही भारतीय शिष्यांचे मॅकग्राने केले अभिनंदन, म्हणाला…