भारतीय क्रिकेट संघानंतर आता पाकिस्तानमध्ये बदलाचे वारे वाहताना दिसत आहे. नुकतेच भारताचा कर्णधार विराट कोहली याने टी२० विश्वचषकानंतर टी२० संघाच्या नेतृत्त्वपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर आता पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याच्या नेतृत्त्वावर टांगती तलवार आहे. मात्र आझमने संघाचे नेतृत्वपद बदलण्याची चर्चा फेटाळून लावली आहे. त्याचे लक्ष न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका जिंकण्यावर आहे. त्याला न्यूझीलंडविरुद्ध निवडलेल्या संघावर पूर्ण विश्वास असल्याचे त्याने म्हटले आहे.
बाबर म्हणाला, ‘मला वाटते की बोर्ड अधिकारी आणि मुख्य निवड समितीनेही संघ निवडीबाबत स्थिती स्पष्ट केली आहे. त्यामुळे मी देखील संघाला पूर्ण पाठिंबा देत आहे आणि आमच्या संघाची न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी राहील अशी आशा आहे. प्रत्येक वेळी निवड बैठकीत मी माझा सल्ला दिला होता. हा एका व्यक्तीचा संघ नाही.’ परंतु दुर्दैवाने सुरक्षेच्या कारणास्तव न्यूझीलंडने हा दौरा सुरू होण्याआधीच रद्द केला आहे.
बाबरने असेही स्पष्ट केले की, नेतृत्व बदलाबाबत त्याला काहीही सांगण्यात आलेले नाही किंवा अशी चर्चाही झालेली नाही. तो पुढे म्हणाला की, ‘क्रिकेटविश्वात ही एक सामान्य गोष्ट आहे की कर्णधाराला त्याचे लक्ष्य साध्य करावे लागते आणि चाहत्यांच्या अपेक्षांनुसार जगावे लागते.’
यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवे अध्यक्ष रमीज राजा यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, इम्रान खान यांच्या प्रमाणेच कर्णधार बाबरकडूनही तशाच अपेक्षा राहतील. रमीज म्हणाले होते की, ते बाबरला वैयक्तिकरित्या इतके चांगले ओळखत नाहीत. त्यामुळे या प्रकारामध्ये त्याच्या कर्णधारपदाचे मूल्यांकन करणे खूप घाईचे ठरेल.
कर्णधारपद बदलाच्या चर्चाबद्दल विचारले असता बाबर म्हणाला, ‘आतापर्यंत मला याबद्दल काहीच कल्पना नाही.’ परंतु नव्या अध्यक्षांच्या वक्तव्यावरुन त्याने येत्या काळात चांगली कामगिरी न केल्यास त्याच्या हातून संघाची सूत्रे जाणार असल्याची लक्षणे दिसत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोहली धोनीच्या मार्गावर चालतोय, तो आता नव्या कर्णधारांना घडवेल’, बालपणीच्या कोचचा दावा
‘तो’ देवदूतासारखा धावला, नाहीतर आज क्रिकेटर नव्हे पाणेपाणी विकणारा असतो; युवा शिलेदाराचा खुलासा
फक्त ७ खेळाडूंनी केलंय टी२०मध्ये टीम इंडियाचं नेतृत्त्व, चक्क २ मुंबईकरांचा आहे यात समावेश