पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम याने नुकतेच त्याच्या एका चाहत्यााला खुल्या पत्रात पाठिंबा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बाबर आझम याने लिहिले की, खेळाडू आणि चाहत्यांचे एक खास नाते असते आणि दोघेही एकमेकांशिवाय काहीच नसतात. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका दिव्यांग चाहता मुलाच्या ट्विटला बाबर आझम याने आता प्रतिक्रिया दिली आहे. यासाठी बाबर आझमचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे.
ट्विटरवर माजिद मजीद या वापरकर्त्याने एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये इंग्लंडमध्ये राहणारा लहान दिव्यांग चाहता मुहम्मद अकीलने असे म्हटले की, “अस्सलाम वालेकुम, मी मुहम्मद अकील आहे. इंग्लंडमध्ये तुमचे स्वागत आहे. मी नेहमीच तुम्हाला फॉलो करतो आणि मी कराची किंग्जचा मोठा समर्थक आहे. अल्लाह तुम्हाला खूप यश देईल. ”
तुम्हाला माहितीच असेल की, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज संघाकडून खेळतो. बाबर आझमने अकीलला उत्तर देत लिहिले की, “तुम्ही माझे हार्दिक स्वागत केले आणि अद्भुत शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद. हे लहान मुला, अल्लाहचा पाठिंबा सदैव तुझ्याबरोबर असो. माझ्याकडून तुला खूप खूप प्रेम.”
Thank you for a warm welcome and wonderful wishes, you little champ. May Allah always keep you blessed. Lots of love. ❤️ https://t.co/Sd4HN8OgBz
— Babar Azam (@babarazam258) July 2, 2021
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजमने दिलेल्या प्रतिसादावर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा व्यस्त काळातही एका चाहत्या मुलासाठी वेळ काढून प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रमवारीत बाबर आझम 865 गुणांसह अव्वलस्थानी आहे. या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली 857 गुणांसह दुसर्या आणि रोहित शर्मा तिसर्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौर्यावर आहे. 8 जुलै ते 20 जुलैदरम्यान संघाला इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी20 सामने खेळायचे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराट’ मनाचा माणूस! कोरोनामुळे जिवलगांना गमावलेल्या कुटुंबाना करणार मदत, मिळवला नव्या संघाशी हात
‘अशी’ ३ कारणे ज्यामुळे पृथ्वी शॉला इंग्लंड दौऱ्यावर पाठवणे ठरेल अयोग्य
बीसीसीआयसाठी यंदाची दिवाळी असेल बंपर दिवाळी! आयपीएलच्या नव्या संघांची नावे येणार पुढे