साल २०२१ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी२० विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. यासाठी सर्वच संघांची संघबांधणीसाठी तयारी सुरु झाली आहे. अशातच ही स्पर्धा सुरु होण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अहसान मणी यांनी भारताला धमकावले आहे.
त्यांचे म्हणणे आहे की बीसीसीआयकडून त्यांना व्हिसा मिळण्याचे अश्वासन लिखित स्वरुपात हवे आहे. लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांच्या बोर्डाची मतं सांगितली आहेत.
मणी म्हणाले, क्रिकेटमध्ये ‘द बिग थ्री’ ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आम्हाला केवळ राष्ट्रीय संघ म्हणूनच नाही, तर आमच्या चाहत्यांना, अधिकाऱ्यांना आणि पत्रकारांना व्हिसा मिळावा यासाठी लेखी हमी हवी आहे.’
तसेच मणी यांनी पुढे म्हटले की ‘आम्ही आयसीसीला सांगितले आहे की मार्च अखेरीपर्यंत भारताकडून आम्हाला लिखित हमी हवी आहे, ज्यामुळे आम्हाला आमची भूमीका स्पष्ट करता येईल किंवा आम्ही हा विश्वचषक भारतातून युएईमध्ये स्थलांतरीत व्हावा यासाठी मागणी करु.’
एवढेच नाही तर बीसीसीआयकडून सुरक्षेची हमी देखील मणी यांनी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की या विश्वचषकादरम्यान संपुर्ण पाकिस्तानच्या गोटाला सुरक्षिततेची हमी हवी आहे.
याबरोबर मणी यांनी म्हटले की ‘पाकिस्तानने भारताशिवाय क्रिकेट चालवण्याची योजना केली आहे.’ भारत आणि पाकिस्तान संघात गेल्या काही वर्षांत द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत. हे दोन संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये आमने सामने येतात.
महत्त्वाच्या बातम्या –
“आयपीएलच्या आधी स्मिथच्या मांसपेशींमध्ये ताण आल्यास आश्चर्य वाटू नये”, दिग्गजाचे मोठा दावा
“टॉम आणि जेरी आले एकाच संघात”, आरसीबीच्या ताफ्यात ‘या’ खेळाडूचा समावेश होताच चहलने केले मजेशीर ट्विट