---Advertisement---

टी 20 वर्ल्ड कपमध्ये नाचक्की करणाऱ्या खेळाडूंना पीसीबीकडून दिलासा, दंडाबाबत मोठी अपडेट

On: शनिवार, मार्च 14, 2026 6:25 PM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधून सुपर-८ नंतर बाहेर पडला. यामुळे संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर नाराज होत पाकिस्तान क्रिकेट बोर्डने (पीसीबी) त्यांच्याकडून दंड वसूल केला, अशा वृत्तांना जोर धरला होता. हा दावा पीसीबीने शनिवारी (१४ मार्च)फेटाळला आहे.

स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान खेळाडूंकडून दंड घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पीसीबीचे प्रवक्ते आमीर मीर यांनी या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, “पाकिस्तानी खेळाडूंवर दंडाबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही आणि केलीही जाणार नाही. पीसीबीने असा निर्णय कधीच घेतला नव्हता. हे सर्व सोशल मीडियावरील गॉसिप आहे.”

“कोणत्याही खेळाडूंवर दंडात्मक कारवाई केलेली नाही, मात्र खेळाडूंनी चांगली कामगिरी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी बोर्ड एक नियोजन करण्याच्या विचारात आहे”, असेही मीर यांनी पुढे सांगितले आहे.

पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक खेळाडूंवर ५० लाख पाकिस्तानी रुपयांचा (अंदाजे १६.५ लाख रुपये) दंड ठोठावण्यात आल्याचे समोर येत होते. या स्पर्धेत पाकिस्तानचे नेतृत्व सलमान अली आगाने केले होते. संघ सुपर-८च्या टप्प्यातूनच बाहेर झाला आणि सलग दुसऱ्यांदा टी२० विश्वचषकाची बाद फेरी गाठण्यात अपयशी ठरला.

पाकिस्तानी खेळाडूंना दंड झाल्यानंतर त्यांचा अनुभवी क्रिकेटपटू अहमद शहजादने दंडाचे पैसे भरण्याची तयारी दर्शवली होती. तो म्हणाला, “जेवढ्यांना दंडीत करायचे असेल तेवढ्यांना करा. देश ठिक होत असले किंवा क्रिकेट सुधारत असले तर मी देतो ते पैसे.”

या स्पर्धेत पाकिस्तानचा सर्वात मोठा पराभव पंरपंरागत प्रतिस्पर्धी भारताकडून झाला होता. तेथे भारताने पाकिस्तानला १७६ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान १८ षटकात सर्व विकेट्स गमावून बसला आणि ६१ धावांनी सामना हरला.

सुपर-८मध्ये पोहोचल्यावर पाकिस्तानचा पहिला सामना पावसामुळे वाया गेला होता. त्यामुळे पाकिस्तान आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एक-एक गुण दिला होता. नंतर इंग्लंड विरुद्धचा सामना गमावल्याने त्यांच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात अडचण निर्माण झाली. शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध होता, तेव्हा त्यांना तो सामना मोठ्या फरकाने जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही आणि ते स्पर्धेबाहेर झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---