भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. तत्पूर्वी एक बातमी समोर आली आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी 2025मध्ये न्यूट्रल वेन्यूवर टी20 मालिकेसाठी भारताला आमंत्रित करु शकतात. अशी माहिती पीसीबीच्या सूत्रांनी दिली आहे. पण पीसीबी क्रिकेट बोर्ड आगामी 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तानबाहेर खेळवण्यासाठी तयार नाही.
कोलंबो, श्रीलंका येथे होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) भारतीय नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांची यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेणार आहेत. पीसीबीच्या सूत्रांनी सांगितलं की, “या प्रस्तावावर मोहसिन नक्वी आणि जय शाह यांच्या भेटीदरम्यान चर्चा केली जाणार आहे. ज्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत आणि पाकिस्तान संघ मोकळ्या दिवसांमध्ये सामने खेळण्याची शक्यता आहे.”
आयसीसीच्या वार्षिक परिषदेत ही चर्चा महत्त्वाचा भाग असणार आहे. तर अजेंड्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने न्यूट्रल वेन्यूवर खेळले जाण्याची शक्यता आहे. विशेषत: भारत सरकार आणि बीसीसीआयनं चिंता व्यक्त केल्यानंतर, संकेत दिले आहेत की, सुरक्षा आणि राजकीय चिंतेमध्ये भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही.
2024च्या टी20 विश्वचषकात जेव्हा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने आले होते. त्यावेळी भारतानं पाकिस्तानला धूळ चारत मैदानावर वर्चस्व गाजवलं होतं. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) देण्यात आला होता. बुमराहनं या सामन्यात पाकिस्तानच्या फलंदाजांना डोकं वर काढू दिलं नव्हतं.
महत्त्वाच्या बातम्या-
संजू, रुतुराज, अभिषेक शर्माच्या निवडीवर अजित आगरकरचं खळबळजनक वक्तव्य!
‘फॅब फोर’च्या शर्यतीत विराट पडला मागे, जो रुटची मोठी आघाडी; लारा-द्रविडचा विक्रमही धोक्यात
लवकरच होणार या वेगवान गोलंदाजाचं भारतीय संघात पुनरागमन; अजित आगरकर यांनी केला मोठा खुलासा