भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) यांच्या दरम्यान सध्या काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. चालू वर्षाच्या मध्यात होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. तसेच, वनडे विश्वचषक भारतात खेळला जाईल. याच मुद्द्यावरून तयार झालेली परिस्थिती आता निवडू लागल्याचे सांगितले जाते. यासाठी पीसीबीने दोन पावले मागे घेतल्याचे दिसते.
भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानत न आल्यास पाकिस्तान संघ विश्वचषकासाठी भारतात येणार नाही, अशी भूमिका पीसीबीने काही काळापूर्वी घेतली होती. मात्र, बीसीसीआयने आपला विरोध कायम ठेवल्याने आशिया चषकाचे आयोजन पाकिस्तानसह युएईमध्ये करण्याचे नक्की झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा पीसीबीनेच झुकती भूमिका घेतल्याचे दिसते.
भारतात होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी पाकिस्तानने येण्याचे निश्चित केले असून, त्यांना आपले सामने चेन्नई व कोलकाता येथे खेळायचे आहेत. त्यांनी याबाबत बीसीसीआयशी बोलणे केले असून, बीसीसीआय अंतिम निर्णय घेईल.
पाकिस्तान संघाला चेन्नईमध्ये यापूर्वी अनेकदा मोठा पाठिंबा मिळाल्याचे दिसले आहे. तसेच, 2016 टी20 विश्वचषकावेळी त्यांनी आपले सामने कोलकाता येथे खेळले होते. त्यामुळेच त्यांनी या दोन ठिकाणांची मागणी केली आहे.
यावेळी केवळ भारतातच वनडे विश्वचषकाचे आयोजन होईल. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत हा विश्वचषक खेळला जाईल. भारतातील एकूण 12 शहरांमध्ये विश्वचषक खेळला जाणार असून, यामध्ये अहमदाबाद, मुंबई, मोहाली, दिल्ली, हैदराबाद, कोलकत्ता, धर्मशाला, बेंगलोर, राजकोट, गुवाहाटी, लखनऊ व इंदोर या शहरांचा समावेश आहे. यापूर्वी वनडे विश्वचषकाचे आयोजन भारतीय उपखंडात तीन वेळा झालेले. मात्र, दरवेळी भारतासह इतरही देश आयोजक म्हणून भूमिका पार पाडत होते.
(Pakistan Cricket Board Shortlist Kolkata And Chennai For There Matches In 2023 ODI World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीसीबी मोठे नुकसान झेलण्यासाठी तयार? भारत आशिया चषकात खेळला नाही तर…
मी चांगलाच खेळलो! वाचा 20 चेंडूत 18 धावा करणारा केएल राहुलचे काय म्हणाला