आशिया चषक 2023 च्या सुपर-4 सामन्यांना सुरवात होणार आहे. सुपर चार सान्यासाठी भारतीय संघ, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांनी सुपर-4 मध्ये स्थान मिळवले आहे. सुपर-4 चा पहिला सामना 6 सप्टेंबरला पाकिस्तान आणि बांगाला देश यांच्यात लाहोरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधिच पाकिस्तान संघाने आपला संघ जाहीर केला आहे.
आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तानने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पाकिस्तानने पहिला सामना नेपाळविरुद्ध 238 धावांनी जिंकला होता. यानंतर भारतविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन सारखीच होती. मात्र्, आता यात बदल करण्यात आला आहे.
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याने सुपर-4 टप्प्यातील त्याच्या पहिल्या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. पाकिस्तान संघाचा स्टार अष्टपैलू मोहम्मद नवाजला संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज फहीम अश्रफचा याचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीसोबतच फहीम खालच्या फळीतही चांगली फलंदाजी करू शकतो. यामुळे त्याला संघात सामिल करण्यात आले आहे.
पाकिस्तान संघात मोहम्मद नवाज आणि शादाव खान असे दोन फिरकीपटू गोलंदाज आहेत. मात्र, पहाल्या दोन सामन्यात नवाजला काही खास करता आले नसल्याने त्याला संघातून बाहेर करण्यात आले आहे. यामुळे पकिस्तान संघ आता फक्त एक फिरकीपटू गोलंदाजासोबत बागंलादेशविरुद्ध खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र, सलमान आगा आणि इफ्तिखार अहमद यांच्या रूपाने संघात दोन अर्धवेळ फिरकीपटू आहेत. गरज असेल तेव्हा दोघेही चांगली गोलंदाजी करू शकतात.
Our playing XI for the Super 4 match against Bangladesh 🇵🇰💪#AsiaCup2023 | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/kEfGMsvsgr
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 5, 2023
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचे प्लेइंग इलेव्हन-
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह . (pakistan cricket team announce his playing 11 for super 4 asia cup)
महत्वाच्या बातम्य-
विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने संघ तर निवडला, पण ‘या’ दिग्गज क्रिकेटर्सच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह कायम
Asia Cupमधून बाहेर पडताच तुटले अफगाण कर्णधाराचे हृदय! सामन्यानंतर मागितली माफी, लगेच वाचा