पाकिस्तानच्या क्रिकेट टीमनं आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी खूप तयारी केली होती. संघानं यासाठी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये चक्क सैन्याचं ट्रेनिंग देखील घेतलं होतं. मात्र बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाचा आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 5 गडी राखून दारूण पराभव झाला. यानंतर आता सोशल मीडियावर पाकिस्तानच्या टीमची खूप खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडिया यूजर्स एकापाठोपाठ एक मीम्स शेअर करून संघाची फिरकी घेत आहेत.
चाहते सोशल मीडियावर लिहित आहेत की, आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानच्या टीमनं खूप घाम गाळला होता. टीमनं सैन्याप्रमाणे ट्रेनिंग देखील घेतलं होतं, मात्र याचा काहीच फायदा झाला नाही. पाकिस्तानला आयर्लंडसारख्या तुलनेनं दुबळ्या संघाकडून दारूण पराभवाला सामोरं जाव लागलं. तुम्ही सोशल मीडियावर हे मीम्स येथे पाहू शकता.
#IREvsPAK
The Artist The Art pic.twitter.com/JXJCVzJSHu pic.twitter.com/gz7BACXbJ2— Ashley (Molly) (@_meAshMolly) May 11, 2024
All This Training And Drama Just To lose Against Ireland 😂😂#IREvPAK #IREvsPAK pic.twitter.com/Foza9JaHxu
— Lokesh 🚩 (@Lokesh22299) May 10, 2024
All this training and drama just to lose against Ireland and NZ-Z team?🤣🫵#IREvPAK #IREvsPAK #PAKvIRE pic.twitter.com/0Pd7O9B2LL
— Abdullah Neaz 🇧🇩 (@Neaz__Abdullah) May 10, 2024
Training Failed 🤣🤣🤣🤣#BabarAzam𓃵 #PakistanCricket #PAKvIRE #PAKvsIRE #IREvPAK #IREvsPAK
— Secular Chad (@SachabhartiyaRW) May 10, 2024
The highly anticipated cricket series of the year – PAK vs IRE ⚔️ #PAKvsIRE pic.twitter.com/SprfLUGMqn
— SURESH YADAV (@MyWaySkyWay17) May 10, 2024
वास्तविक, गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या टीमचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हिडिओमध्ये नसीम शाह, मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांसारखे पाकिस्तानी क्रिकेटपटू सैन्याप्रमाणे ट्रेनिंग करताना दिसले होते. या क्रिकेटपटूंनी रस्सीखेच, दगड वाहून नेणे, पर्वतावर चढणे आणि बंदुकीतून गोळीबार करणे अशा प्रकारची ट्रेनिंग केली होती. या ट्रेनिंगचे व्हिडिओ पाहून क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात पाकिस्ताननं 20 षटकांत 6 गडी गमावून 182 धावा केल्या होत्या. आयर्लंडला विजयासाठी 183 धावांचं लक्ष्य होतं. संघानं हे लक्ष्य 19.5 षटकांत 5 गडी गमावून गाठलं. आयर्लंडकडून अँड्र्र्यू बलबर्नी यानं शानदार फलंदाजी केली. त्यानं 55 चेंडूत 77 धावा ठोकल्या. त्यानं आपल्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकार लगावले. याशिवाय हॅरी फॅक्टर यानं 27 चेंडूत 36 धावांचं महत्त्वाचं योगदान दिलं.
पाकिस्तानसाठी अब्बास आफ्रिदीनं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि इमाद वसीम यांना प्रत्येकी 1-1 बळी मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग बातमी! दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतचं निलंबन! बीसीसीआयची मोठी कारवाई
‘थाला’ला भेटायला चाहता सरळ मैदानात! ‘माही’च्या पाया पडला अन्….हा व्हायरल व्हिडिओ नक्की पाहाच